शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बस थांबे गॅरेजचालकांना आंदण; महापालिकेसह वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:57 IST

एनएमएमटीच्या प्रवाशांची गैरसोय

नवी मुंबई : पदपथावरील बेकायदा गॅरेजमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या बहुतांशी भागात अशाप्रकारे बेकायदा गॅरेज व वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करणाऱ्या दुकानांचे पेव फुटल्याचे दिसून आले आहे. अनेक भागांत थेट एनएमएमटी थांब्याच्या समोरच वाहनदुरुस्तीचा उद्योग सुरू असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेसह वाहतूक विभागाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नवी मुंबईत वसाहतीअंतर्गत रस्त्यावरी बेकायदा पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. रस्त्यावर दुतर्फा उभ्या असणाºया वाहनांमुळे परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते दुतर्फा वाहनपार्किंगमुळे आणखी निमुळते झाले आहेत. त्यामुळे एनएमएमटीसह स्कूलबसना अशा रस्त्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रुग्णवाहिकांचा तर अनेकदा खोळंबा झाल्याची उदाहरणे आहेत.

रस्त्यांवरील दुतर्फा वाहन पार्किंग त्रासाचे ठरत असतानाच आता एनएमएमटीच्या बसथांब्यासमोर अगदी रस्त्यावर थाटलेल्या वाहनदुरुस्तीच्या बेकायदा व्यवसायाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढविली आहे. शहरवासीयांना एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा, यादृष्टीने परिवहन उपक्रमाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार अनेक भागात गरजेनुसार एनएमएमटीच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे बस थांबे उभारले आहेत. मात्र, आता हेच बस थांबे अनधिकृत गॅरेज व्यावसायिकांना आंदण ठरू लागले आहेत.

कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ एनएमएमटीचा बस थांबा आहे. या बसथांब्यावर नेहमीच रिक्षांची दुरुस्ती सुरू असते. समोरच गॅरेज असल्याने येथील कारागीर सर्रासपणे बस थांब्याच्या समोर रिक्षा उभ्या करून दुरुस्तीची कामे करतात. एका वेळी चार ते पाच रिक्षा उभ्या असतात. तसेच याच रस्त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाही रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते.

रिक्षांच्या दुरुस्तीचे काम अगदी बसथांब्याच्या समोरच केले जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. तसेच बसचालकांनाही बस थांब्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्याच्या मधोमध बस उभी करावी लागते. विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘लोकमत’मधून अनेकदा वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, त्यानंतरही हे बेकायदा गॅरेज जैसे थे असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कोपरखैरणेप्रमाणेच शहराच्या विविध भागात अशाच प्रकारे गॅरजचालकांचा उच्छाद दिसून येतो. बोनकोडे येथील बालाजी कॉम्प्लेक्ससमोरील बस थांब्यावरही बेकायदेशीर वाहनांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. शहरातील अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात हे चित्र पाहावयास मिळते.

एनएमएमटीचे थांबे गॅरेजचालकांनी बळकावले आहेत. कारवाईचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सर्रासपणे बसथांब्याच्या समोरच वाहनांना जॅक लावून दुरुस्तीची कामे केली जातात. कोपरखैरणेसह बोनकोडे येथील बालाजी टॉवर्सच्या समोरील थांब्यावरही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. कोपरखैरणेसह शहरातील अनेक बसथामबे गॅरेजचालकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती आहे. 

टॅग्स :Parkingपार्किंगNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार