शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या वातानुकूलित मुख्यालयाचा तिजोरीवर भार

By admin | Updated: June 21, 2017 05:49 IST

पामबीच रोडवरील महापालिकेचे वातानुकूलित भव्य मुख्यालय पांढरा हत्ती ठरू लागले आहे. प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रुपये वीज बिल भरावे लागत आहे. डि

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पामबीच रोडवरील महापालिकेचे वातानुकूलित भव्य मुख्यालय पांढरा हत्ती ठरू लागले आहे. प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रुपये वीज बिल भरावे लागत आहे. डिसेंबर २०१३ पासून मे २०१७ पर्यंत तब्बल १० कोटी २५ लाख रूपये वीज बिलावर खर्च झाले आहेत. अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना वातानुकूलित सुविधा देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला जात असून ही उधळपट्टी थांबविण्याची मागणी होवू लागली आहे.नवी मुंबई महापालिकेने २०० कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करून पामबीच रोडवर भव्य मुख्यालय उभारले आहे. देशातील महापालिकेची सर्वात आलिशान इमारत म्हणूनही तिची ओळख निर्माण होत आहे. वास्तविक सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा कमीत कमी वापर होणे आवश्यक असते. इमारतीची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल याची दक्षता घेणे आवश्यक असते. परंतु महापालिका मुख्यालयाची रचना करताना या सर्वांचा विसर पडला आहे. इमारतीमध्ये विद्युत दिवे बंद असल्यास काम करणे शक्यच नाही. पूर्ण इमारतीमध्ये सेंट्रल ए. सी. बसविण्यात आली आहे. सात मजली इमारतीमध्ये कुठेही पंखा नाही. पूर्ण इमारतच वातानुकूलित असल्याने वीज बिलावर प्रचंड खर्च होत आहे. जुईनगरमधील नगरसेविका तनुजा श्रीधर मढवी यांनी सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. दोन वर्षांमध्ये मनपा मुख्यालयासाठी किती वीज वापरण्यात आली असून त्यासाठी किती खर्च झाला याविषयी विचारणा केली होती.महापालिका मुख्यालयाला डिसेंबर २०१३ पासून विद्युत व्यवस्था कार्यरत करण्यात आली. पहिल्याच महिन्यात वापर नसताना ७ लाख रूपये वीज बिल आले होते. फेब्रुवारी २०१४ पासून प्रत्यक्ष मुख्यालय सुरू झाले व वीज बिलांचा आकडा फुगतच गेला. एप्रिल २०१४ मध्ये ३० लाख ३५ हजार रूपये बिल भरावे लागले होते. तो विक्रम जून २०१६ मध्ये मोडीत निघाला व विक्रमी ३६ लाख रूपये बिल भरावे लागले होते. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रूपये खर्च करावे लागत असून देशातील कोणत्याही सरकारी कार्यालयांपेक्षा जास्त विजेचा वापर नवी मुंबई महापालिका करत आहे. सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सुरू असून ती थांबविण्याची मागणी केली जात आहे.