शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ क्षेत्रातील इमारती घेणार भरारी; परवानगीच्या कचाट्यात अडकलेल्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 09:00 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या २० कि.मी. क्षेत्रात कोणतेही बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी सर्वप्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंचीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या २० किलोमीटर क्षेत्रातील बांधकामाच्या उंचीची मर्यादा अखेर शिथिल केली आहे. नागरी हवाई मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता या क्षेत्रात सरासरी समुद्रसपाटीपासून १६०.१० मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीच्या कचाट्यात अडकलेल्या शेकडो इमारतींच्या विकासाला गती मिळणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या २० कि.मी. क्षेत्रात कोणतेही बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी सर्वप्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंचीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, फेब्रुवारी २०२० पासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवी मुंबई विमानतळाच्या २० कि.मी. परिघात कोणत्याही बांधकाम प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र देताना सरासरी समुद्रसपाटीपासून केवळ ५५.१० मीटर उंचीची मर्यादा घालून दिली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून विमानतळ प्रभावित क्षेत्रातील नियोजित, पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या  बांधकाम प्रकल्पांना स्थानिक प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्र मिळविताना अडचणी येत होत्या. 

संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या प्रभावित क्षेत्रातील रखडलेल्या बांधकामांना गती मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेत नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले.  - डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

उंचीची अट शिथिल करण्याबाबत येत होता दबाव n या पार्श्वभूमीवर इमारतींच्या उंचीची अट शिथिल करण्याबाबत विकासकांकडून सिडकोवर दबाव येत होता. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार २२ जुलै २०२२ रोजी  नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सिडको, एनएमआयएएल आणि आयई-एईसीकॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या संदर्भात एक संयुक्त बैठक पार पडली.n त्यात विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २० कि.मी.च्या परिघातील ५५.१० मीटर उंचीची मर्यादा शिथिल करून आता ती १६०.१० मीटर इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला.n साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.