शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल न्यायालयाची इमारत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:41 IST

प्रथम वर्ग न्यायालयाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. गळती थांबविण्यासाठी छतावर प्लॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले आहे. इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून

नितीन देशमुखपनवेल : प्रथम वर्ग न्यायालयाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. गळती थांबविण्यासाठी छतावर प्लॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले आहे. इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, वकिलांसह नागरिकांना जीव धोक्यात घेवून वावरावे लागत आहे. न्यायालय परिसरातील समस्या वाढत असून, नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.पनवेल शहरातील बंदर रोडवर खाडीकिनारी कनिष्ठ न्यायालयाची इमारत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या इमारतीचे बांधकाम झाले असून सद्यस्थितीमध्ये हे बांधकाम धोकादायक झाले आहे. छताला गळती लागली आहे. पावसाचे पाणी इमारतीमध्ये येवू नये यासाठी छतावर प्लॅस्टिकचा कागद टाकण्यात आला आहे. यानंतरही पाणी गळती थांबत नाही. इमारतीमध्ये स्लॅबचा भागही कोसळू लागला आहे. काही दिवसापूर्वी स्लॅबचा भाग कोसळून शशिकांत मुंढे या वकिलाच्या डोक्यात पडला होता. पूर्ण इमारतच जर्जर झाली आहे. कोणत्याही क्षणी ती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक, वकील व इतर सर्वांनाच जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे. इमारतीची दुरूस्ती किंवा पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे. परंतु अद्याप स्ट्रक्चर आॅडिट झाले नसल्यामुळे पुढील सोपस्कारही होवू शकलेले नाहीत. दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने पनवेलमध्ये न्यायालयाची नवीन इमारत बांधली आहे. परंतु तेथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केले आहे. त्याचपद्धतीने प्रथम वर्ग न्यायालयासाठीही नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे.न्यायालय परिसरातील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. येथील कामकाज सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्याय म्हणून जनरेटरची व्यवस्था केली आहे. पण जनरेटर अनेक वेळा बंद अवस्थेमध्येच असतो. वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागाच नाही. महिला वकिलांना बसण्यासाठीची खोली अत्यंत लहान आहे. ५ ते ६ वकीलच त्या खोलीमध्ये बसू शकतात. नाइलाजाने रोडवर उभे राहूनच अशिलांशी संवाद साधावा लागतो. न्यायालयात येणाºया पुरूषांसाठी प्रसाधनगृहच नाही. महिलांसाठीच्या प्रसाधनगृहाची साफसफाईच केली जात नसल्याने त्याचा वापर होत नाही. प्रसाधनगृहामध्ये पाण्याचीही व्यवस्था नाही. त्यांची साफसफाई करण्यासाठीची व्यवस्थाच नाही. पनवेल हागणदारीमुक्त महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण न्यायालयासारख्या प्रमुख कार्यालय परिसरामध्ये प्रसाधनगृहाची पुरेशी सोय नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेविषयीही नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. न्यायालय परिसरामध्ये वाहने उभी करण्यासाठीही जागाच नाही. रोडवरच वाहने उभी करावी लागत आहेत.