शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकमुळे सापडला पळालेला मुलगा; तीन वर्षांपूर्वी सोडलेले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:05 IST

दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. घर सोडून गेल्यानंतर तो नाशिक येथील ढाब्यावर काम करत होता.सागर भालेराव हा दहावीचा विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार जानेवारी २०१४ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याअनुषंगाने सखोल तपास करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सर्व पोलीस ठाणे, सोशल मीडिया यावर त्याचे छायाचित्र प्रसारित करूनही त्याच्याविषयीची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अशातच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील काही वर्षांत बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलांचा नव्याने शोध घेण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान बेपत्ता असलेल्या सागर भालेराव याच्याविषयीची संशयास्पद माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार शशिकांत पाटील, विकास जाधव यांंच्या पथकाने तपासाला सुुरवात केली होती. सागर याच्या आतेभावासोबत एक तरुणी फेसबुकवर चॅटिंग करत होती. मात्र सदर तरुणीबाबत त्याला संशय होता. यामुळे त्याने सदर बाब पोलिसांंना सांगितली होती. यामुळे फेसबुकवरील सदर खात्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला असता, त्याचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप तपासला असता सागरच्या चेहरापट्टीशी मिळताजुळता चेहरा असल्याचे समोर आले. शिवात तो नाशिकमधील उमराणे गावात ढाब्यावर नोकरीला असल्याचेही तपासात उघड झाले. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाने सागरच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना घेवून सदर ठिकाणी गेले. यावेळी सागर भालेराव हा त्याठिकाणी आढळून आला. यावेळी सागर याने दहावीच्या परीक्षेच्या भीतीमुळे घर सोडल्याचे सांगितले. तर घर सोडल्यानंतर तो नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सदर ठिकाणी ढाब्यावर कामाला लागला होता. फेसबुकवर खाते खोलण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक असल्यामुळे मोबाइल नंबरमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोचले.

टॅग्स :Facebookफेसबुक