शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीतील मद्य दुकानांना ना हरकत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 06:59 IST

अप्पर पोलीस अधीक्षक : घोलवडच्या सभेत महिलांना आश्वासन

अनिरुद्ध पाटील

डहाणू : घोलवड पोलिसांची वार्षिक तपासणी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्फत शुक्र वारी घेण्यात य्आली. त्या नंतर या ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत जेष्ठ नागरीक, महिला, सागर रक्षक आदींची बैठक पार पडली. यावेळी बोर्डीतील ग्रामसभेत मंजुर तीन बियरशॉप आणि दोन परिमट रूम बाबत महिलांचा कडाडून विरोध लक्षात घेता, पोलीस विभाग या बाबत ना हरकत दाखल देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या या बाबतचा आढावा चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर परिसरातील नागरिक, ग्रामराक्षक दल, महात्मा गांधी तंटामुक्त समिती आणि महिला यांच्या करीता आयोजित सभेत विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर बोर्डी गावातील नव्याने मंजूर मद्य दुकानांविषयी उपस्थित महिलांनी पोलिसांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तरु ण पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज असून त्याकरीता समाजप्रबोधन झाले पाहीजे. शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया या गावात महिलांचा मद्य दुकानांना विरोध असल्याने पोलिसांचेही सहकार्य लाभेल असा विश्वास दिला. त्यामुळे या आंदोलनात लढणाºयांचा आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केली. यावेळी घोलवड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामरक्षक दलाचे सदस्य, घोलवड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश अमृते व सदस्य, या ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्रातील नागरिक उपस्थित असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.पालघर जिल्ह्यात नवीन परमीट रु म तसेच बियर विक्री परवान्यासाठी आलेल्या प्रस्तावाला ना हरकत दाखला न देण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. बोर्डीकरिता सुद्धा हीच भुमिका असेल.- योगेश चव्हाण, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक, पालघर 

टॅग्स :palgharपालघरMumbaiमुंबई