शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टास्कच्या बहाण्याने दोघांना लाखोंचा गंडा 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 4, 2023 20:16 IST

पार्ट टाईम नोकरीचा शोध पडतोय महागात.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ऑनलाईन टास्क करून अधिक नफा कमवण्याचे आमिष दाखवून दोघांना लाखोंचा गंडा घातल्याचा घटना घडल्या आहेत. त्यात आयकर विभागाच्या निरीक्षकाचाही समावेश आहे. पार्ट टाईम व्यवसायातून अधिक कमाई करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आहे ते देखील गमावले आहेत. 

शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीचे असलेले अज्ञान त्यास कारणीभूत ठरत आहे. त्यातच झटपट पैसे कमवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकवत आहेत. अशाच प्रकारे आयकर विभागाच्या निरीक्षकाला देखील ४ लाख ७५ हजाराचा फटका बसला आहे. बेलापूर येथील रहिवाशी नवीन छिल्लर यांना पार्ट टाईम नोकरीतून अधिक पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्या व्यक्तींना त्यांनी प्रतिसाद दिला असता त्यांना टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. याद्वारे त्यांचा विश्वास संपादित करून त्यांच्याकडून ४ लाख ७५ हजार रुपये उकलण्यात आले. यानंतर अधिक पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्याचप्रकारे खारघर येथील सलमान खान यांना सायबर गुन्हेगारांनी ३६ लाख २३ हजाराचा गंडा घातला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना मॅसेज करून पार्ट टाइम कामातून दिवसाला ३ ते ४ हजार रुपये कमवण्याचा पर्याय सुचवला होता. त्याद्वारे खान यांनी संबंधितांवर विश्वास ठेवला ठेवून त्यांच्या खात्यावर ३६ लाख २३ हजार रुपये पाठवले होते. यानंतर मात्र त्यांना कोणताही मोबदला न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी