शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

कैद्यांनी ओथंबलेल्या कारागृहांना दोन हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांचा बूस्टर

By नारायण जाधव | Published: October 12, 2023 4:03 PM

तळोजा कारागृहालाही मिळणार वाढीव १७३ कर्मचारी-अधिकारी

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी लाेकसंख्या आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी ठेवण्यात येत आहेत. राज्यात ४५ ठिकाणी ६० कारागृहे असून राज्यभरातील कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार ७२२ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी २०२३ मध्ये संख्या वाढून ४१,०७५ झाली आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येला लगाम घालून कारागृहात होणारे अनुचित प्रकार टाळताना कारागृह प्रशासनाचे नाकीनऊ येत होते. यामुळे कारागृहांतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत होती. अखेर तिची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने कारागृह विभागासाठी सध्याच्या पदांव्यतिरिक्त दोन हजार पदांच्या निर्मितीस मान्यता दिली आहे. यात नवी मुंबईतील तळोजा कारागृहालाही वाढीव १७३ कर्मचारी-अधिकारी मिळणार आहेत.

राज्यात ६० कारागृहेमहाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, १ विशेष कारागृह, १ किशोर सुधारालय, १ महिला कारागृह, खुलीकारागृहे १९ आणि १ आटपाडीची खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहांसाठी १२ ऑगस्ट २०२२ राेजी ५०६८ पदांचा आकृतीबंध मंजूर केला होता. त्यास अखेर एक वर्षाने मंत्रिमंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत मान्यता दिली असून त्यानुसार गृहविभागाने खास कारागृह विभागासाठी २००० पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय ६ ऑक्टोबर २०२३ प्रसिद्ध केला आहे.

कारागृह कर्मचाऱ्यांचा ताण कमी होणारराज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. मात्र, त्यानुसार कर्मचारी-अधिकारी नसल्याने या अतिरिक्त कैद्यांच्या हालचालींवर वाॅच ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनावर मोठा ताण येत आहे. यातून अनेकदा कारागृहातून कैद्यांचे पलायन, आपसांत हाणामाऱ्या असे प्रकार सर्रास घडतात. यात कोणताही दोष नसतानाही कारागृहातील नेमणूक असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. यामुळे ते नेहमीच तणावात ड्युटी करताना दिसतात. मात्र, आता अतिरिक्त कर्मचारी मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

तळोजा, आर्थर रोड, येरवड्यात कुख्यात गुन्हेगारराज्यातील पुण्याचे येरवडा, मुंबईचे आर्थर रोड आणि नवी मुंबईतील तळोजा कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ठेवले आहे. यात अरुण गवळी, अबू सालेम, डीएचएलएफचे वाधवान बंधू यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. आता या तिन्ही कारागृहांना वाढीव कर्मचारी मिळणार आहेत.

तळोजाला मिळणारे वाढीव कर्मचारीयातील तळोजा कारागृहाला २ परिचारक, १२५ शिपाई, २२ हवालदार, ५ सुभेदार, श्रेणी १ चे ४ व श्रेणी २ चे १० तुरुंग अधिकारी, १ उपअधीक्षक आणि लिपिक, मिश्रक, मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ज्ञ प्रत्येकी १ मिळणार आहेत.

टॅग्स :Prisonतुरुंग