शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

By नामदेव मोरे | Updated: March 15, 2024 20:08 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले

नवी मुंबई: राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले, असा टोला अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना मारून आता राज्यात नवीन उद्योग येत असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सिडको क्षेत्रामधील ५ हजार कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या १,१२९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी त्यांनी राज्याची औद्योगिकदृष्ट्या भरभराट सुरू आहे. नवीन उद्योग येत आहेत. गुंतवणूक वाढत आहे. राज्यातील उद्योग पळविले जात असल्याचे बोलणाऱ्यांच्या काळातच उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता संपूर्ण राज्यात सुरक्षित वातावरण आहे. नवीन उद्योगांना सर्व परवाने लवकर मिळवून देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या प्रगतीच्या इंजिनाची नवी मुंबई अश्वशक्तीनवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या बाबतीत उत्तम काम केले आहे. नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. राज्याच्या प्रगतीच्या इंजिनाची नवी मुंबई अश्वशक्ती असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

एमएमआर विभागात नवीन प्रकल्पसिडकोच्या माध्यमातून विमानतळाचे काम गतीने सुरू आहे. वेळेत विमानतळाचे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत विकासासाठी खूप संधी असून, शासनाच्या माध्यमातून या परिसरात व एमएमआर विभागात नवीन प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, महेश बालदी, रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते. भूमिपूजन झालेले सिडकोचे प्रकल्पखारघर - तुर्भे जोडणारा मार्ग  मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल.भूमिपुत्र भवनचे लोकार्पण. उलवे किनारी मार्ग भूमिपूजन.प्रवासी जलवाहतूक टर्मिनलचे उद्घाटन. नवी मुंबई महानगरपालिकेने भूमिपूजन केलेली कामेऐरोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास.पाम बीच रोडवरील घणसोली ऐरोली मार्गाचे भूमिपूजन.अमृत योजनेंतर्गत दहा प्रकल्पांचे भूमिपूजन.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे