शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

मुंबई ऊर्जा कंपनीने लावला ‘नैना’ला सुरुंग; आराखड्यातील भूखंडांमधूनच वीजवाहिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 05:41 IST

सिडकोची मेहनत वाया जाणार, शेतकऱ्यांत तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिडको महामंडळाने तब्बल ११ वर्षे प्रचंड मेहनत घेऊन नैना प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून त्याच्या कामास आता कुठे सुरुवात केली आहे. मात्र, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी नैनासाठी देऊन सिडकोस सहकार्य केले आहे, तेही आता मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीच्या अडवणुकीमुळे अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना सिडकोने तयार केलेल्या विकास आराखड्यातील भूखंडामधूनच मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने आपल्या वीजवाहिनीचा मार्ग निवडल्याने नैना पुढील संकटे आणि सिडकोची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेला लगाम लावला नाही तर स्थानिक आणि शेतकरीही आंदोलनात उतरतील व त्यात सरकारला निष्कारण वाईटपणा येऊ शकतो, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नैनाच्या परिघात सिडकोने ज्या टीपी स्कीम तयार केल्या आहेत, त्यातील नेवाळी परिसरातले शेतकरीही नैनात सहभागी झाले आहेत. त्यांना सिडकोने जे भूखंड आखून दिले त्याच भूखंडातून मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने आपली वीजवाहिनी टाकण्याचा नियमबाह्य निर्णय घेतला असून त्यासाठीच्या नोटिसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. ऊर्जा कंपनीचे हे काम सिडकोलाही मान्य नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

आम्ही नुकसान सोसून आमच्या १०० टक्के जमिनी देऊन सिडकोकडून अवघ्या ४० टक्के जमिनी घेतल्या. यानंतर सिडकोने जनसुनावणी घेतली. या सुनावणीत मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीचेही म्हणणे ऐकून त्यांनी सुचविल्यानुसारच आपल्या टीपी स्कीममधील भूखंडाची रचना, रस्ते, पायवाटा टाकल्या. यासाठी सिडको अधिकाऱ्यांनी ११ वर्षे दिवसरात्र मेहनत घेतली. असे असतानाही आता मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने कोणालाही विचारात न घेता आपल्या वीजवाहिन्यांच्या मूळ मार्गात बदल करून मनमानीपणे शेतकऱ्यांना आखून दिलेल्या भूखंडामधून ती टाकण्याचा निर्णय घेऊन सिडकोच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीविरोधात सिडकोसह या शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. 

  • आम्ही जमिनी देऊन आधीच ६० टक्के नुकसान सोसले आहे. आता पुन्हा मुंबई ऊर्जा प्रकल्पासाठी ते का सोसायचे, असा प्रश्न या बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नेवाळीप्रमाणेच खारघर, ओवे, मुर्बी परिसरातही मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने अशी मनमानी केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या विरोधामुळे वीजवाहिनी टाकण्याचे काम सध्या थांबले आहे.
  • सिडकोच्या नगररचना अधिकाऱ्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने जनसुनावणीत सांगितल्यानंतरच आम्ही रस्ते, पदपथासह वीजवाहिनी मार्ग आणि भूखंडाचे आरक्षण टाकले आहे. आता ते परस्पर सिडकोत विचारात न घेता वीजवाहिनीचा मार्ग बदलू शकत नाहीत. बदललेल्या मार्गाबाबत त्यांनी सिडकोस विचारात घेतलेले नाही.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आम्ही स्थानिक शेतकरी, प्रांताधिकारी यांच्यासमवेत सामूहिक पाहणी दौरा केला. या पाहणीत स्थानिकांनी ११ टॉवरचे मार्ग बदलण्याची सूचना केली होती. १६ पैकी १० टॉवर एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या परवानगीअभावी फेल होत आहेत. त्यामुळे एकाही टॉवरचा मार्ग बदलता येणे अशक्य आहे. तशा प्रकाराचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला आहे. यापूर्वी शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार नैना क्षेत्रातील मार्गात आम्ही काही बदल केला आहे.- निनाद पितळे (प्रकल्प अधिकारी, मुंबई ऊर्जा मार्ग कंपनी)

सिडकोने मुंबई ऊर्जाचे म्हणणे ऐकल्यानंतर टीपीएस ४ चा आराखडा तयार केला आहे. यामुळे त्यांनी टीपीएस ४ मधील शेतकऱ्यांच्या भूखंडांसह सिडकोने सामाजिक सुविधांसाठी आरक्षित ठेवलेले भूखंड आणि महसूल मिळविण्यासाठी विक्रीस ठेवलेल्या मोकळ्या जागा, रस्ते बाधित होणार नाहीत याची काळजी घेऊनच आपली वीजवाहिनी टाकावी. याच अटीवर मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीस सिडकोने आपले ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यानुसारच काम करणे बंधनकारक असून सध्या ते जे काम करीत आहेत, ते सिडकोच्या नियमानुसार नाही.- मोहन निनावे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, नैना प्रकल्प सिडको.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईelectricityवीजcidcoसिडको