शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोईम्बतूर ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा; पनवेलमध्ये गाडी थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 05:19 IST

कोईम्बतूर ते हिस्सार (राजस्थान) या एक्स्प्रेसला उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने देण्यात आली होती.

पनवेल : कोईम्बतूर ते हिस्सार (राजस्थान) या एक्स्प्रेसला उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने देण्यात आली होती. या धमकीमुळे रेल्वे प्रशासन, एटीएस व पोलिसांनी ही एक्स्प्रेस पनवेलमध्ये आल्यानंतर तपासणी केली. मात्र, यात संशयास्पद काहीच न आढळल्याने गाडी वसईमार्गे गुजरात, अहमदाबादकडे रवाना झाली. तर दुसरीकडे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, या बॅगेत कोणतीही बॉम्बसदृश वस्तू नआढळल्याने ती बॅग डिस्पोज करण्यात आली. त्यामुळे पोलीस व श्वान पथकाने सुटकेचा नि:श्वास टाकला.कोईम्बतूर-हिस्सार ही राजस्थानकडे जाणारी रेल्वे गाडी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात येते. शनिवारी दुपारी सुटलेली गाडी उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबाच्या नावाने देणारा फोन सकाळी ८ वाजता चेन्नई कंट्रोल येथे आल्यानंतर या धमकीने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. रविवारी दुपारी २.३0च्या सुमारास पनवेल येथे १६ डब्यांची कोईम्बतूर-हिस्सार गाडी पनवेल स्थानकात आल्यानंतर याठिकाणी एटीएस पथके, नवी मुंबई एटीएस, नवी मुंबई बीडीडीएस, मुंबई लोहमार्ग एटीएस, मुंबई लोहमार्ग बीडीडीएस, मुंबई लोहमार्ग क्र ाइम ब्रँच, पनवेल लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाणे, आरपीएफचे जवान, पनवेल शहर पोलीस, खांदेश्वर पोलीस, पनवेल तालुका पोलीस, लोहमार्ग, आरपीएफ आणि नवी मुंबईची एकूण तीन श्वान पथके या ठिकाणी आली. या वेळी रेल्वेची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही संशयास्पद न सापडल्याने अखेर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.