नवी मुंबई : आग्रोळी गावासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करत आहे. परंतु प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. रेल्वे रूळावरून मृतदेह घेवून जावा लागत आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला नाही तर भविष्यात मृतदेह पालिका मुख्यालयामध्ये घेवून येण्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी दिला आहे. माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी आग्रोळी गावातील स्मशानभूमीच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी केली. गाव व विस्तारित गावठाण परिसरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास रेल्वे रूळावरून मृतदेह बेलापूरच्या गावच्या स्मशानभूमीत घेवून जावा लागत आहे. सात वर्षांपासून पाठपुरावा करत असूनही प्रशासन लक्ष देत नाही यामुळे आता शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मृतदेह पालिकेत ठेवण्याचा इशारा
By admin | Updated: March 23, 2017 01:44 IST