शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळालगत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:30 IST

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तळवली येथील तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुण ठाणे येथील रात्रशाळेतील बारावीचा विद्यार्थी होता.

नवी मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तळवली येथील तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुण ठाणे येथील रात्रशाळेतील बारावीचा विद्यार्थी होता. रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असला, तरी त्याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता त्याच्या कुटुंबीयांनी वर्तवली आहे.सुजित सोनवणे (१७), असे मयत तरुणाचे नाव असून, तो तळवली नाका येथील राहणारा आहे. ठाणे येथील रात्रशाळेत तो बारावीचे शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी रात्रशाळेत जाण्यासाठी तो घरातून बाहेर गेला होता. मात्र, यानंतर तो परत न आल्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांंनी रबाळे पोलिसांकडे केली होती. यादरम्यान पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्याचा शोध सुरू असतानाच, गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रबाळे नाका येथे रेल्वे रुळालगत आढळून आला. रबाळे पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला. या वेळी तपासादरम्यान तो मृतदेह सुजित याचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे वडील श्यामराव सोनवणे यांनी रबाळे पोलीस ठाण्याबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना आवर घातला; परंतु पालकांची तक्रार प्राप्त होताच, सुजित बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यात केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले. तर गुरुवारी सकाळी सुजित याचा मृतदेह रेल्वे रुळालगत आढळल्याने सदर घटनेची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे. त्याचा मृत्यू रेल्वेतून पडून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा