शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटामुळे उलवेतील घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:01 IST

शनिवारी उलवे गावात टेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटांमुळे तीन घरांना तडे गेले. यासंदर्भात दहा गाव संघर्ष समितीने रविवारी बैठक घेऊन गावांचे स्थलांतरण केल्यानंतर हे स्फोट घडविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

ठळक मुद्देविमानतळ प्रकल्पाचे काम आधी पुनर्वसन करा मगच स्फोट करादहा गाव संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू झाले असून, ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता सिडकोने पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. मात्र, शनिवारी उलवे गावात टेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटांमुळे तीन घरांना तडे गेले. यासंदर्भात दहा गाव संघर्ष समितीने रविवारी बैठक घेऊन गावांचे स्थलांतरण केल्यानंतर हे स्फोट घडविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विमानतळाच्या कामाला आमचा विरोध नाही. टेकडीच्या सपाटीकरणासाठी केल्या जाणार्‍या स्फोटांमुळे घरांना तडे जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी यापूर्वीही केला होता. मात्र, शनिवारी उलवे येथील समीर म्हात्रे, प्रेमनाथ मढवी, आदेश म्हात्रे यांच्या घरांना तडे गेल्याने उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी या ग्रामस्थांची बैठक उलवे येथील हनुमान मंदिरात पार पडली. या वेळी सिडकोने सर्वप्रथम गावांचे पुनर्वसन करावे, ही मागणी करण्यात आली. भरावाच्या कामाने कोणाताही धोका नसल्याने ते चालू ठेवावे, मात्र, स्फोटामुळे घरांना तडे जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता दहा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा म्हात्रे यांनी व्यक्त केली. याकरिता सिडको व्यवस्थापकीय संचालय, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालकमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांसोबत झालेल्या बैठकीत सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्फोटामुळे ग्रामस्थांच्या घरांना कोणताच धोका नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता घरांना तडे जाऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.