शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जेएनपीटीतील कामगारांचा काळा दिन, कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:45 IST

JNPT News : केंद्र सरकारने जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. खासगीकरणावरच ठाम असलेल्या सरकारने जेएनपीटीचा प्रस्ताव याआधीच धुडकावला आहे. आता स्वेच्छानिवृती योजना सुरू केली आहे.

उरण - जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात बुधवारी कामगारांनी काळा दिन पाळला. काळे कपडे, काळ्या टोप्या, मफलर घालून आणि काळे झेंडे दाखवून कामगारांनी जेएनपीटी, केंद्र सरकारच्या विरोधात प्रशासन  भवनासमोरच जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. टर्मिनलचे खासगीकरण रोखण्यासाठी १६ डिसेंबर रोजी खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली.केंद्र सरकारने जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. खासगीकरणावरच ठाम असलेल्या सरकारने जेएनपीटीचा प्रस्ताव याआधीच धुडकावला आहे. आता स्वेच्छानिवृती योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेलाही कामगारांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या दबावाला कामगार जुमानत नसल्याने सर्वपक्षीयांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सर्वपक्षीयांनीही खासगीकरणाला विरोध केला आहे. खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी जेएनपीटी बंदरातील कामगार आणि कामगार संघटनांनी जेएनपीटीचे आजी-माजी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कामगारांनी काळा दिन पाळला. यावेळी काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आणि जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्या विरोधात घोषणाबाजी करतानाच सेठी यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच बंदर तोट्यात आले असल्याचा आरोप माजी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी केला. बंदराच्या खासगीकरण प्रस्तावाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत कामगार संघर्ष करतील. त्यामुळे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी मोर्चाआधीच राजीनामा देऊन केंद्राला बंदराचे खासगीकरण न करण्याचा प्रस्ताव सादर करावा.- दिनेश पाटील, कामगार ट्रस्टी. जेएनपीटीने कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण न करता स्वत: बंदर चालवावे. यासाठी नवीन क्युसी क्रेन खरेदी करण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करावा. बंदर नफ्यात येण्यासाठी कामगार बंदर प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील.- भूषण पाटील, कामगार ट्रस्टी   काळी माती, ढेपळं दिली अध्यक्षांना भेट  ट्रेनिंग सेंटरपासून प्रशासन भवनापर्यंत महिला कामगारांसह सहभागी झालेल्या जेएनपीटी कामगारांनी प्रशासन भवनासमोरच जोरदार घोषणाबाजी केली.प्रवेशद्वारावरच आंदोलक कामगारांना सीआयएसएफच्या सुरक्षारक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरक्षारक्षक आणि कामगार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मात्र, संतप्त झालेल्या कामगारांनी गेटच्या साखळ्या तोडून प्रशासन भवनात प्रवेश केला.जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदरासाठी संपादन करण्यात आलेली जमीन कशी होती, ती पाहिलीच नसल्याची टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी जमिनीची काळी माती व ढेपळं अध्यक्षांना भेट म्हणून देण्यात आली.ढेपळात उगवलेले गवत, टोपल्या पाहून कामगार पुतळा जाळण्याची तयारी करीत असल्याच्या संशयाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावरून पोलीस आणि कामगार नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. मात्र, हे सर्व जाळण्यासाठी नव्हे, तर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांना भेट देण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितल्यानंतर वस्तू जप्त करण्यासाठी सरसावलेले पोलिस माघारी फिरले.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई