शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या समर्थनार्थ आयोजित बैठकीत भाजपाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 02:42 IST

पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.आयुक्तांच्या समर्थनार्थ जनतेचा विश्वासदर्शक ठराव या कार्यक्र माचे २१ मार्चला मिडलक्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे . या कार्यक्र माच्या चर्चेकरिता नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच शेकाप, काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरूवातीला कार्यक्रमाची रूपरेषा सांगत आयोजकांनी उपस्थित सर्व पक्षाच्या मान्यवरांना व्यासपीठावर बसण्यास सांगितले. यामध्ये व्यासपीठावर कांतीलाल कडू, अरुण भिसे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे जिल्हाप्रमुख गणेश कडू, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, हरेश केणी आदींचा समावेश होता. दरम्यान, आयुक्तांच्याविषयी चर्चा सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांनी आयुक्तांच्या विषयावरून मुद्दामून राजकारण केले जात असल्याचे सांगत सभेत गोंधळ घालण्यास सुरु वात केली.नियोजित बैठकीत आपले मत मांडण्यासाठी सहभागी झालेले श्याम फडणीस, कीर्ती मेहरा, मुकुंद इनामदार आणि अन्य सामाजिक संस्थांच्या ज्येष्ठांनी विरोध दर्शवित नियोजित बैठकीबद्दल बोलण्यास सांगितले असता दर्शना भोईर, नीता माळी, सुहासिनी केकाणे तसेच भरत जाधव यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे तासभर गोंधळात गाजलेल्या या बैठकीत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या बैठकीच्या मध्यंतरी भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेवक जगदीश गायकवाड हे देखील सहभागी झाले. यावेळी जगदीश गायकवाड यांनी आयुक्त कशाप्रकारे कामात अडथळे घालत आहेत ही माहिती उपस्थितांना दिली. दरम्यान, बैठकीत वाढता गोंधळ पाहता बैठक तहकूब करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला.भाजपाच्या पहिल्या तुकडीला नियोजनाची बैठक ताब्यात घेण्यात अपयश आल्याने अर्ध्या तासाच्या अंतराने नगरसेवक जगदीश गायकवाड, संतोष शेट्टी, किशोर चौतमोल यांचे आगमन झाले. गायकवाड यांनी आयुक्तांविरोधात भाषण केले. आयुक्तांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची देखील भेट त्यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या संघटना व पदाधिकारी घेणार आहेत.भाजपा समर्थकांनी घातलेल्या गोंधळाविषयी ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालामनपा आयुक्तांविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार आहे. भाजपाच्या या भूमिकेविषयी शहरवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. २१ मार्चला आयुक्तांवरील विश्वासदर्शक ठराव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी शहरात जनजागृती सुरू केली असून पहिल्याच मीटिंगमध्ये भाजपा पदाधिकाºयांनी गोंधळ घातला. यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी भाजपा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घालत असल्याची टीका होऊ लागली आहे.

टॅग्स :panvelपनवेल