शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:31 IST

चार नगरसेवकांचा राजीनामा : शिवसेनेमध्ये करणार प्रवेश

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या दुसºयाच दिवशी महापालिकेमधील चार नगरसेवकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. चारही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून तुर्भे स्टोअर्स व एमआयडीसी परिसरावर याचा परिणाम होणार आहे.

भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी व संगीता वास्के यांनी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे पत्र दिले. या वेळी विरोधी पक्ष नेते विजय चौगुलेही उपस्थित होते. कुलकर्णी यांची तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर ते बोनसरीपर्यंत झोपडपट्टी परिसरावर पकड आहे. माजी मंत्री गणेश नाईक शिवसेनेत असल्यापासून ते त्यांचे समर्थक होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपमध्येही त्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत परिवहन समिती सभापती, तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद भूषविले आहे. त्यांच्या समर्थकांनाही परिवहन व इतर समित्यांवर संधी देण्यात आली होती.मागील काही महिन्यांपासून कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंड, ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपूल बांधण्यात यावा या मागण्यांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत जाणार हे जवळपास स्पष्ट झाले होते.निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु प्रत्यक्षात कोणीच पक्ष सोडलेला नव्हता. कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रत्यक्षात गळती सुरू झाली आहे.तुर्भे परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे याला आमचे प्राधान्य असते. परिसरातील नागरिकांच्या इच्छेखातर आम्ही भाजपचा राजीनामा दिला आहे. नगरसेवक पदाचाही राजीनामा आयुक्तांकडे दिला आहे.- सुरेश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई