लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल महानगरपालिकेमार्फत वाढीव मालमत्ता कर,शास्ती माफीसाठी भाजपने पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या दालनाबाहेर दि.17 रोजी भाजपने आंदोलन केले.शास्ती माफी द्या अशी घोषणाबाजी करीत भाजपने ही निदर्शने केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शास्ती माफी का थांबवली आहे असा जाब पालिका आयुक्तांना विचारला.शास्ती माफीला कोणता अडथला आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.यावर उत्तर देताना आयुक्तांनी प्रशासकीय पातळीवर तांत्रिक बाबींची माहिती आमदार ठाकूर यांना दिले.नगरविकास खात्याच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर कोणतेही आदेश अद्याप पालिकेला प्राप्त झाले नसल्याने शास्ती माफीचा निर्णय घेता येत नसल्याचे आयुक्त चितळे यांनी स्पष्ट केले.