नवी मुंबई : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने शहरात मशाल रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य ते सुराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली. वाशी सेक्टर १५ ते दिघा तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. देशातून निरक्षरता चले जाव, पाण्याचा अपव्यय थांबवावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, व्यसनमुक्त समाज, भ्रष्टाचारमुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी केले.आमदार मंदा म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे, कृष्णा पाटील, हरिष पांडे, संदीप कारंडे, गुजाब नाविक, रामदीप हलवाई, संकेत पाटील, राज जयस्वाल, अमित ढोमसे, विकास सिंह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्यावतीने मशाल रॅलीचे आयोजन
By admin | Updated: August 12, 2016 02:34 IST