शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक क्रमांकाने मिळवून दिला कोट्यवधींचा महसूल; एक क्रमांकासाठी चार लाखांचे शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 00:15 IST

आरटीओची चार कोटी ६१ लाखांची वसुली

मयूर तांबडेपनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला २०१९ या वर्षात आकर्षक क्रमांकातून तब्बल चार कोटी ६१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाकडून सात कोटी ९६ लाख ५२ हजार ६६३ इतक्या रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाने सहा हजार ७९३ वाहनांवर कारवाई केली. यात दुचाकी, चारचाकी, ट्रेलर, ट्रक, टेम्पो, रिक्षा आदीचा समावेश आहे. तर ८३२ गाड्या कागदपत्रे पूर्ण नसल्याने वा अन्य करणामुळे जमा करण्यात आल्या आहेत. अशा वाहनचालकांकडून तब्बल सात कोटी ९७ लाख ५२ हजार ६६३ रुपयांचा दंड वसूल केला आहे व सहा कोटी ९२ लाख ५१ हजार १२१ रुपयांचा कर असा एकूण १४ कोटी ८९ लाख तीन हजार ७८४ रुपयांचा दंड व कर घेण्यात आला.

पनवेल शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या गाडीपेक्षा गाडीचा नंबर लक्षवेधी असावा, याकडे अनेकांचा कल असतो. तर एकाच घरात एकाच क्रमांकाच्या गाड्या असल्याचेही प्रकार दिसून येत आहेत. या आकर्षक क्रमांकाचा फायदा प्रादेशिक परिवहन विभागाला होतो. त्यामुळे गाडी रजिस्टर करताना आरटीओ विभागात अतिरिक्त शुल्क मोजून हवा असलेला, व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांची रीघ लागलेली असते.गेल्या वर्षभरात व्हीआयपी क्रमांकातून आरटीओला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये चार कोटी ६१ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा महसूल याअंतर्गत मिळाला आहे. यावर्षी १५ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली असून, दोन कोटी ३८ लाखांच्या गाडीची खरेदीही पनवेलमध्ये करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, सेझ, उरण-जेएनपीटीचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वर्दळीसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून पनवेलला सध्या पसंती मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. शहरवासीयांचे राहणीमान उंचावले असून, त्याचप्रमाणे नवनवीन महागड्या गाड्याही शहरात मोठ्या संख्येने धावताना दिसत आहेत.

दर महिन्याला वाहनांच्या संख्येत वाढ होत असते. पनवेलमध्ये सद्यस्थितीत दोन लाख ७५ हजार १६१ दुचाकी, एक लाख २५ हजार ५६ चारचाकी, ३२ हजार ३१० तीन चाकीरिक्षा, १२ हजार ७९० टुरिस्ट वाहने, दोन हजार ६५५ बसेस, ७२ हजार २९४ ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ३,३०३ जेसीबी, पोकलेन आदी वाहनांची नोंद आहे. पनवेल परिसरात वाढू लागलेल्या वाहनांच्या संख्येमुळे प्रादेशिक परिवहन विभाग मालामाल होत असून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळवत आहे.पनवेलच्या नागरिकांना यापूर्वी पेण येथील प्रादेशिक परिवहन विभागात जावे लागत असे. २०१० पासून पनवेल येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. ४ नोव्हेंबर २०१० पासून ते ३१ डिसेंबर २०१९ या नऊ वर्षांत पनवेल येथील आरटीओमध्ये पाच लाख २३ हजार ५६९ गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे.हल्ली आकर्षक क्रमांकाला चालकांकडून मागणी असून, त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास त्यांची तयारी असते. त्यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी वाढ होत आहे. याशिवाय फ्लाइंग स्कॉड सतर्क असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर वर्षभर कारवाई सुरू असते. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेलयंदा जवळपास १५ इम्पोर्टेड गाड्यांची खरेदी करण्यात आली असून, दोन कोटी ३८ लाखांच्या गाडीची खरेदीही पनवेलमध्ये करण्यात आली आहे. वाहनांच्या १ या क्रमांकासाठी आधी एक लाख रुपये इतके शुल्क घेतले जायचे. मात्र, आता हेच शुल्क चार लाख रुपये इतके करण्यात आले आहे. यंदा एका गाडीला १ क्रमांक देण्यात आला असून त्यासाठी चार लाख रुपये घेण्यात आले आहेत.

टॅग्स :panvelपनवेल