शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा सर्वांत मोठा धक्का माथाडी कामगारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:33 IST

४१ वर्षांचा लढा अपूर्णच : आरक्षणासाठी दोन पिढ्यांचा अविरत संघर्ष सुरूच

नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना करून लढा उभा केला. दोन वर्षांच्या लढ्यानंतरही सरकारने आरक्षण न दिल्यामुळे १९८२ मध्ये अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. त्यानंतरही कामगारांनी हा लढा सुरूच ठेवला आहे. चळवळीतील सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. न्याय मिळेल, असे वाटत असताना अचानकच आरक्षण रद्द झाल्याचे वृत्त समजताच सर्वांत मोठा धक्का आरक्षणासाठी दाेन पिढ्यांपासून लढणाऱ्या माथाडी कामगारांना बसला आहे.             ऐंशीच्या दशकामध्ये मुंबईत माथाडी कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ उभी केली. संघर्ष करून हमाल, श्रमजीवी कामगारांसाठी देशातील पहिला माथाडी कायदा निर्माण करण्यास भाग पाडले. कामगारांची चळवळ उभी करताना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेपण त्यांच्या निदर्शनास आले. एकीकडे राज्यातील सत्तास्थानावर मराठा समाजातील नेते व दुसरीकडे समाजातील मोठा वर्ग अल्पभूधारक शेतकरी किंवा मुंबई व इतर शहरांत मजुरी करत असल्याचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित केले. १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना करून आरक्षणासाठीची चळवळ सुरू झाली. माथाडीचा मुलगा माथाडीच होणार नाही. तो शिकला पाहिजे व त्याला आरक्षणाचा लाभ मिळून तोही अधिकारी झाला पाहिजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो कामगार या चळवळीमध्ये सहभागी झाले. २२ मार्चला भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला आव्हान दिले. समाजाला आरक्षण जाहीर करा, नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. सरकारने गांभीर्याने घेतले नाही व सूर्योदयापूर्वीच अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली.

माथाडी कामगारांनी चार दशकांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरूच ठेवला. मराठा महासंघ व इतर संघटनांनीही लढ्याला बळ दिले. समाजाला आरक्षण मिळवून देऊन आपल्या नेत्याला खरी आदरांजली वाहायची, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हजारो कामगार आरक्षणासाठीच्या लढ्यात सहभागी होत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्येही कामगारांचे योगदान मोठे होते. सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर कामगारांनी जल्लोष केला होता. आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडावी यासाठीही पाठपुरावा केला होता. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे राज्यातील माथाडी कामगारांचे लक्ष लागले होते. न्यायालयाने आरक्षण रद्द केले व सर्वांनाच धक्का बसला. आरक्षणाचे स्वप्न धुळीस मिळाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. 

अश्रू अनावर झालेमराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना अश्रू अनावर झाले. आरक्षणासाठी वडिलांनी प्राणाची आहुती दिली. कामगार वर्षानुवर्षे लढा देत आहे. अनेकांनी स्वत:चा प्राण गमावला असून, या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसल्याचे मत व्यक्त केले आहे.

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी पहिले बलिदान दिले. कामगारांच्या दोन पिढ्या आरक्षणासाठीच्या चळवळीमध्ये सक्रिय असून, आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.- संतोष आहिरे, मसाला मार्केट

कांदा बटाटा मार्केटमध्ये १९७८ पासून वडील कार्यरत होते. अद्याप चळवळीमध्ये सक्रिय आहेत. समाजाला आरक्षण मिळावे, हे प्रत्येक माथाडी कामगाराचे स्वप्न असून, ते स्वप्न आज भंग पावले.-योगेश बर्गे, कार्यकर्ते माथाडी संघटना

 

टॅग्स :LabourकामगारMaratha Reservationमराठा आरक्षण