शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेतला गाव: तांदळाच्या भाकरीचे गाव, घणसोलीमध्ये दररोज होते १० हजार भाकऱ्यांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:42 IST

भाकर ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे.

- अनंत पाटील

भाकर ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे १० हजार भाकरींची विक्री होते.

तांदळाच्या भाकरीचा चंद्रच या गावातील महिलांना आपल्या पायावर उभा करण्यास कारणीभूत ठरला आहे. भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या कुटुंबालाही आधार दिला आहे.

स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. याच गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीच्या विकासकामांमुळे बदलत चालला आहे. गावाचे आता शहरीकरण झपाट्याने होत असताना गावातील महिलांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे आपली वेगळी ओळख टिकवून आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, या गावात घरटी बनविल्या जाणाऱ्या तांदळाच्या पिठापासून तयार होणारी पांढरी शुभ्र भाकरी. या भाकरीच्या व्यवसायामुळे गावठाणातील महिला मंडळे आणि काही महिलांच्या बचत गटांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण झाला आहे.एक महिला एकावेळी ५० ते ७० भाकरी मातीच्या तव्यावर करून देते.  नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलांनाही येथील तांदळाच्या भाकऱ्या पुरविल्या जातात. घणसोलीत मशीनवर भाकरी बनविण्याच्या १० ते १२ गृहउद्योग आहेत. तर कोपरखैरणे गावातील काही निवडक बचत गटाच्या महिला मंडळाकडूनही तांदळाच्या भाकऱ्या ऑर्डर्सनुसार बनविल्या जातात.

१५ रुपये मशीनवर तयार केलेली भाकरी २० रुपये चुलीवरील भाकरीचुलीवर एक भाकरी तयार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. तर मशीनवर एकाचवेळी १० मिनिटांमध्ये १० ते १५ तांदळाच्या भाकरी तयार होतात. वेळ आणि कमी प्रमाणात इंधन बचत होत असल्याने भाकरीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.- गीता सुविद पाटील, भाकरी केंद्रचालक, घणसोली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई