शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! तुमच्या पाणीपुरीतील पाणी शौचालयातील तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 07:32 IST

वाशी स्थानकात स्वच्छतागृहात आढळला पाणीपुरी स्टॉल

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकातील एका शौचालयात पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचे आढळले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या प्रकारामुळे पाणीपुरी खाणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, शौचालयातील पाणी पाणीपुरीसाठी वापरण्यात येत होते की नाही, याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • वाशी रेल्वे स्थानकातील एका शौचालयात हा पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचे आढळले आहे. 
  • मात्र, या स्टॉलधारकावर अजून कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

रेल्वेने हात झटकलेवाशी रेल्वे स्थानकाच्या आवारात सार्वजनिक शौचालयामध्ये पाणीपुरी स्टॉल असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आली. स्थानकाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम सिडकोचे असल्यामुळे ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच सिडकोच्या सुरक्षारक्षकांनी पाणीपुरी स्टॉल हटवला आहे. या प्रकरणाचा रेल्वे प्रशासनाशी काहीही संबंध नाही.ए. एन. सिंग, व्यवस्थापक, वाशी रेल्वे स्थानक

सिडको विक्रेत्यावर काय कारवाई करते याकडे लक्ष

  • संबंधित पाणीपुरी स्टॉलचालक तसेच सुलभ शौचालय ठेकेदारावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका शीतपेयाच्या मशीनवर पाणीपुरीचे पॅकेट्स ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 
  • ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला  आहे, त्याला व्हिडीओ काढण्यास शौचालय चालक विरोध करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
  • नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणीपुरी, भेळपुरीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. ते चालविणारे फेरीवाले हे मानखुर्द, गोवंडी परिसरातील परप्रांतीय आहेत. स्टॉल ठेवण्यासाठी स्वच्छतागृह चालविणारे पैसेही घेत असल्याची चर्चा आहे. 
  • नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचे संचलन सिडकोकडे आहे. रेल्वे सेवा आणि जीआरपीचा बंदोबस्त वगळता इतर सर्व सेवा सिडको पुरवते. यामुळे सिडको शौचालय चालकासह पाणीपुरी विक्रेत्यावर काय कारवाई करते, याकडे  लक्ष लागले आहे.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई