शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाची भीती न बाळगता स्वत:वर विश्वास ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:28 IST

इतिहास निर्माण करण्याची ताकद सामान्य माणसात असते. त्यासाठी स्वत: वर विश्वास ठेवा आणि पराभवाची भीती बाळगू नका, असे विचार कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर यांनी

पनवेल : इतिहास निर्माण करण्याची ताकद सामान्य माणसात असते. त्यासाठी स्वत: वर विश्वास ठेवा आणि पराभवाची भीती बाळगू नका, असे विचार कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर यांनी मांडले. डी.डी. विसपुते कॉलेज आॅफ फार्मसीच्या ‘आदर्श कला महोत्सवांतर्गत ‘फ्लूओरेजन’ या सांस्कृतिक कार्यक्र माच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.‘फ्लूओरेजन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी धूतपापेश्वर आयुर्वेदिक फार्मसीचे संचालक रणजीत पुराणिक, जयदीप जाधव, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब विसपुते, चिटणीस संगीता विसपुते, प्राचार्य आशीष जैन, सेलिब्रेटी ‘बारायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक व पटकथा लेखक दीपक पाटील, निर्मात्या दैवता पाटील व अभिषेक गोपालन उपस्थित होते.आपण ग्रामीण भागातून एका शेतकरी कुटुंबातून आलो असून, आज शिक्षण आणि मेहनतीमुळेच या पदावर आलो आहे. युनोमध्ये दीड तास भाषण करण्याची संधी मिळाली, हे सर्व आत्मविश्वासामुळे व कष्ट केल्यामुळेच शक्य झाल्याचे या वेळी दिघावकर यांनी सांगितले. आज भारताला महासत्ता बनवण्याची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि स्वत:वर विश्वास ठेवून ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. स्पर्धा परीक्षा देऊन देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी काही मदत लागली तर मला भेटा, असा मोलाचा सल्ला त्यांनी अखेरीस दिला. दैवता पाटील यांनी, करिअरसाठी मुलांनी आईवडिलांशी संवाद साधणे गरजेचे असून, निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करण्याचा सल्ला दिला.