शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना

By नारायण जाधव | Updated: July 17, 2023 20:10 IST

वर्षाला एक लाख पर्यटकांनी भेट दिल्यास मिळतील पाच कोटी, क वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यातील निधीअभावी रखडलेल्या छोट्या पर्यटन स्थळांचा आता लवकरच क वर्ग पर्यटन स्थळांत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यातील ‘ब’ व ‘क’ वर्ग पर्यटन स्थळे घोषित करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. परंतु, एखाद्या स्थळास ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचे निकष नव्हते. ते आता पर्यटन विभागाने निश्चित केले आहेत. यानुसार एखाद्या पर्यटन स्थळांत वर्षभरात एक लाख पर्यटकांनी भेट दिली असली तरी त्यांचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांत समावेश करून वर्षाला पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

शासनाच्या नव्या निकषांचा राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या पर्यटनांना फायदा होणार आहे. यात नवी मुंबईतील गवळीदेव, पांडवकडा या धबधब्यांसह बेलापूर किल्ला, गोवर्धनी माता मंदिरासह शहरांतील जागृतेश्वर, पावणेश्वर या सारख्या मंदिरांनाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाच्या नव्या निकषांनुसार क वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी त्या स्थळास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व असले पाहिजे. त्यात नवी मुंबईतील उपरोक्त सर्व पर्यटनस्थळे बसतात. नवी मुंबईतील गवळीदेव, पांडवकडा या धबधब्यांसह बेलापूर किल्ला, गोवर्धनी माता मंदिरासह शहरांतील जागृतेश्वर, पावणेश्वर मंदिरास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व आहे. शिवाय येथे दरवर्षी एक लाखांवर पर्यटक भेट देतात. गवळीदेव, पांडवकडा या धबधब्याच्या ठिकाणी तर पावसाळ्यात दररोज पाच सहा हजार पर्यटक भेट देतात. तर नवरात्रौत्सावात गोवर्धनी माता मंदिरासह बेलापूर किल्ल्यास दररोज हजारो पर्यटक येतात. याशिवाय अनेक इतिहासप्रेमी या किल्ल्याला सतत भेट देतात.

असे आहेत शासन आदेश

जिल्ह्यातील लहान पर्यटनस्थळी पर्यटकांना मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. हे पाहता, जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय एक किंवा दोन वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव पर्यटन संचालनालयास पाठवावेत, असे निर्देश दिले आहेत.

‘क’ वर्ग पर्यटनस्थळासाठीचे नवे निकष

प्रस्तावित पर्यटनस्थळास दरवर्षी किमान एक लाख पर्यटकांनी भेट दिलेली असावी, पर्यटक संख्या पोलिस अधीक्षक, आयुक्तांकडून प्रमाणित असली पाहिजे. स्थळास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व असले पाहिजे. कोणत्याही पर्यटन, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळी, जत्रास्थळी एकाच प्रासंगिक यात्रेसाठी येणारी संख्या ‘क’ वर्ग देण्यास पुरेशी नाही. तेथे इतर दिवशीही पर्यटक येणे अपेक्षित आहे. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यापूर्वी त्या ठिकाणी किमान मूलभूत सुविधा (पोहच रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इ.) उपलब्ध असल्याची खातरजमा करावी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या प्रस्तावासोबत जागेची मालकी, उपलब्ध क्षेत्राबाबत स्पष्ट माहिती द्यावी.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई