शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

एपीएमसीमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला १२५ पेटी हापूस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:54 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हापूसची आवक होऊ लागली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हापूसची आवक होऊ लागली आहे. शनिवारी सर्वाधिक १२५ पेट्यांची आवक झाली असून, होलसेल मार्केटमध्ये प्रतिपेटीला ३ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे.येथील फळ मार्केटमध्ये शनिवारी कलिंगड व पपईची सर्वाधिक ३५७ टन एवढी आवक झाली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, अननस व टरबुजाचीही मोठ्या प्रमाणात आवक होत असली, तरी शनिवारी मार्केटचे लक्ष वेधले ते हापूस आंब्याने. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच १५ ते २० पेटी आंबा रोज विक्रीसाठी येत आहे. शनिवारी सर्वाधिक १२५ पेट्यांची आवक झाली आहे. देवगडमधून हा आंबा विक्रीसाठी येत असून, त्याला बाजारभावही चांगला मिळत आहे. होलसेल मार्केटमध्ये पाच डझनच्या एक पेटीला ३ ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे.बाजार समितीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे म्हणाले, की आंब्याची कमी, पण नियमित आवक होत आहे. शनिवारी या हंगामातील सर्वात जास्त आवक झाली आहे. मार्चमध्ये खरा हंगाम सुरू होऊन मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईल.