शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणीत ‘देहरंग’चा आधार

By admin | Updated: April 18, 2016 00:49 IST

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबई, पनवेल शहरात पाणीकपात करण्यात आली आहे. पनवेल नगरपालिकेकडून शहरात दोन झोन पाडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात

- प्रशांत शेडगे,  पनवेलधरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबई, पनवेल शहरात पाणीकपात करण्यात आली आहे. पनवेल नगरपालिकेकडून शहरात दोन झोन पाडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एमजेपी आणि एमआयडीसीकडून आलेले पाणी शहरात वितरीत करण्यात येत असल्याने देहरंग धरणातील पाणीसाठ्याचा फारसा उपसा झालेला नाही. परिणामी, आजघडीला धरणात ३५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी शिल्लक असून ७ जूनपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे पाणीबाणीच्या काळातही पाण्याकरिता पनवेलकरांना फारशी वणवण करावी लागणार नाही. पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १०० वर्षांपूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीव्दारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. धरणात गाळ साठल्याने खोली कमी होत आहे. देहरंग धरणातून केवळ २ ते ३ एमएलडी पाणी गेल्या दोन महिन्यांपासून घेण्यात येत आहे. शटडाऊनवगळता इतर वेळी जास्त पाणी घेण्यात आले नाही. त्यामुळे देहरंग धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून मे महिना व शटडाऊनच्या काळात हे पाणी शहरवासीयांना वितरीत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपव्यय टाळण्याकरिता उपाययोजनावितरणातील दुरुस्ती, पाइपलाइनची दुरुस्ती करणे, हौदावर तीन मोटार पर्याय म्हणून ठेवणे,गळती थांबवणे, प्रक्रि या झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, तीन ठिकाणी कूपनलिका खोदून टंचाईग्रस्त भागाला पाणी देणे, सोसायट्यांतील ओव्हरफ्लो थांबविणे यासारख्या उपाययोजना पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम शहरात जाणवत असून जनजागृती सुध्दा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. एमजेपी आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर पनवेलकरांची तहान भागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी नियोजन केले. एमजेपीकडून फेब्रुवारी, मार्च महिन्यातच पाणीकपात करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पनवेल नगरपालिकेनेही पाणीकपात सुरू केली. देहरंग धरणाचा घसा मार्च एंडलाच दरवर्षी कोरडा पडतो. परंतु यावर्षी अद्यापही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे ही बाब दिलासादायी आहे. आम्ही दिवसाआड पाणीपुरवठा करून पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. धरणातील पाणी कमी वापरत असून ते मे महिना किंवा शटडाऊनच्या काळात वापरता येणे शक्य होईल.- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल