शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

पांडवकड्यावर बंदीची ऐशीतैशी

By admin | Updated: June 25, 2016 02:12 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे

वैभव गायकर,  पनवेलगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे. बंदी असूनही शुक्रवारी पर्यटकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. गेल्या तीन-चार वर्षांत पांडवकडा धबधब्यावर सात ते आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्साहाच्या भरात, पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने या दुर्घटना झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने धबधब्यावर बंदी घातली आहे. खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात निसर्गरम्य धबधबा ही कल्पनाच मनाला सुखावणारी आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणाला भेट देतात. मद्यपी पर्यटकांमुळे धबधब्याचा परिसर विद्रूप होत आहे. अतिवृष्टीत धबधब्यावरून पडणारे पाणी जोरात उसळते. अशा वेळी पट्टीचे पोहणारेही वाहून जाण्याचा धोका असतो. या दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने धबधब्यावर बंदी घालण्यात आली आहे. शुक्र वारी पर्यटक दुचाकी घेऊन धबधब्याचा प्रवाह ओलांडताना दिसले. अनेक पर्यटक मुंबई, ठाणे, मुंब्रा परिसरातून आले होते. मुंब्य्रावरून दहा जणांचा ग्रुप याठिकाणी सहलीसाठी आला होता. धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याचे त्यांना माहीत नव्हते. शिवाय त्यांना कोणीही अडवले नसल्याचे अहमद शेख या तरुणाने सांगितले. पांडवकडा धबधब्याच्या परिसरात केवळ बंदी असलेले फलक याठिकाणी लावले आहेत. वनविभागाचे कर्मचारी अथवा पोलीस बंदोबस्त याठिकाणी नसल्याचे आढळून आले. धबधब्यावर पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत. पर्यटकांनी पोलिसांशी वाद न घालता सूचनांचे पालन करावे. अतिवृष्टीत धबधब्यावरून मोठमोठे दगड-गोटे पडतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वनविभागाला ठिकठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - दिलीप काळे, खारघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक