शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘बालनाट्य चळवळ जोपासण्याची गरज’, विद्याताई पटवर्धन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:29 IST

बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज आहे. बालनाट्यामुळे अनेक मुलांच्या बुध्दीला चालना मिळून ती हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे बालनाट्याचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो.

नवी मुंबई : बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज आहे. बालनाट्यामुळे अनेक मुलांच्या बुध्दीला चालना मिळून ती हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे बालनाट्याचा उपयोग शिक्षणासाठी देखील होऊ शकतो. याकरिता ‘लोकमत’ने लहान मुलांच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरवाव्यात, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांनी काढले. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.लोकमत सखी मंचच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सखी सन्मान पुरस्कार २०१७’ हा सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शौर्य, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला-सांस्कृतिक, फॅशन, सामाजिक क्षेत्रातील सखींना सखी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विद्याताई पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाट्यकर्मीच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतल्याचे आभार त्यांनी व्यक्त केले.बालनाट्ये दुर्मीळ होत चालली असल्याने ती पुनर्जीवित करण्याची गरज देखील विद्याताई पटवर्धन यांनी व्यक्त केली. अनेकदा अभ्यासात ढ असलेली मुले देखील बालनाट्यामुळे हुशार झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन आंतरशालेय एकांकिका स्पर्धा भरवाव्यात, असे प्रतिपादनही त्यांनी केले.सखी सन्मान पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शौर्य, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला-सांस्कृतिक, फॅशन, सामाजिक क्षेत्रातील महिलांना ‘सखी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांना नाट्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.- या प्रसंगी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, आरके ग्रुपचे राजेंद्र कोळकर, टिपटॉपचे रोहित शहा, रौनकचे अमरदीप सिंग, बांधकाम व्यावसायिक संदीप तांबे, मोराज बिल्डर्सचे मोहन गुरनानी, रवी मसालेचे विजय जैन, विक्रांत अ‍ॅडर्व्हटायझिंगचे विकास खुल्लर,एचएफएफचे नावेद शेख, जाफर पिरजादा, आरती धुमाळ, अनिता नायडू, स्पार्क डान्स अ‍ॅकॅडमीच्या विनीता रजनानी आदींची विशेष उपस्थिती होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई