शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला जामीन, कारवाईबाबत साशंकता : तांत्रिक बाबींमुळे मिळाले बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:27 IST

सिडकोच्या प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक जगदीश राठोड (५३) यांच्यावर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली होती.

नवी मुंबई : दहा हजारांच्या लाचप्रकरणी कारवाई केलेल्या सिडको अधिकाऱ्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता तांत्रिक बाबीच्या आधारे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे या अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सबळ पुरावे नव्हते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सिडकोच्या प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक जगदीश राठोड (५३) यांच्यावर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली होती. एका दलालाच्या तक्रारीवरून त्यांच्यावर सापळा लावला होता. 

कारवाई परिपूर्ण होती का?दरम्यान, राठोड यांनी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे एसीबीच्याच कारवाईत नमूद होते. त्यामुळे १० हजार रुपये लाच दिली कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय दलालाने तीन हजार रुपये राठोड यांच्या टेबलवर ठेवल्यानंतर एसीबीचे पथक धडकले होते, अशीही चर्चा आहे. याच्या पुष्टीसाठी एसीबीचे उपअधीक्षक म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. कारवाईनंतर बुधवारी राठोड यांना सीबीडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तांत्रिक बाबींच्या आधारे त्यांची जामिनावर सुटका केली. यावरून कारवाई परिपूर्ण होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

दलालांचा दबदबामागील काही दिवसांपासून सिडको व महापालिका मुख्यालयात दलालांचा दबदबा वाढत चालला आहे. कारवाईचा धाक दाखवून कामे साधून घेतली जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामागे कोणाचे अदृश्य पाठबळ आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :cidcoसिडको