बाबा महाराजांनी किर्तनातून समाज प्रबोधन केले - एकनाथ शिंदे

By नामदेव मोरे | Published: October 26, 2023 09:36 PM2023-10-26T21:36:55+5:302023-10-26T21:37:05+5:30

नवी मुंबईतील नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात मुख्यमंत्र्यांनी बाबा महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Baba Maharaj enlightened society through Kirtan - Eknath Shinde | बाबा महाराजांनी किर्तनातून समाज प्रबोधन केले - एकनाथ शिंदे

बाबा महाराजांनी किर्तनातून समाज प्रबोधन केले - एकनाथ शिंदे

नवी मुंबई: ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून अध्यात्माचा वारसा चालविला. साध्या सोप्या शब्दातून माणसांनी कसे वागावे याविषयी प्रबोधन केले असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईतील नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात मुख्यमंत्र्यांनी बाबा महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेस गिरीश महाजन,  आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते. महाराजांनी किर्तन प्रवचनातून अनेक कुटुंबांच्या जीवनातील अंधकार दूर केला. संतांचे विचार घराघरात पोहचविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाविषयी दुख व्यक्त केले आहे. बाबा महाराजांची मुलगी, नातू अध्यात्माचा वारसा पुढे चालवत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले. बाबा महाराजांचे भक्त राज्यभरातून पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येत असून रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

Web Title: Baba Maharaj enlightened society through Kirtan - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.