शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोरोनाग्रस्तांसाठी आयुर्वेद तज्ज्ञ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 00:36 IST

रुग्णांना होणार फायदा : आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार, विहार त्रिसूत्रीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेलमधील कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले आहेत. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध आहार, विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने कोविडच्या अनेक रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष टास्कफोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये पनवेलमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमित दवे सक्रिय सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपाय, अलाक्षणिक व अल्प लाक्षणिक रुग्णांना वैकल्पिक आयुष उपचार देण्याची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार आता पनवेलमधील १५ आयुर्वेदिक वैद्यांच्या टीमला इंडिया बुल्स व देवांशी इन येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना शासनाच्या अधिसूचनेत समाविष्ट औषधांचे रुग्णाच्या संमतीने उपचार करण्यास पनवेल महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.सदर उपचारांसाठी लागणारी औषधे पनवेलमधील श्री धुतपापेश्वर लिमिटेड, पनवेल आणि दवे आयुर्वेद भवन ह्यांच्यामार्फत उपलब्ध केली गेली आहेत. डॉक्टर आपल्या पदरचे पैसे वापरून कोविड रुग्णांची विनामूल्य सेवा करीत आहेत. समाजातील सर्व थरातून ह्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे कौतुक होत आहे.या चिकित्सा उपक्रमात डॉ. सुभाष जैन, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. सुमुख नाईक, डॉ. समीक्षा नवरीकर, डॉ. अमृता नाईक, डॉ. अमित दवे, डॉ. गौरव दवे तसेच पनवेल परिसरातील इतर आयुर्वेद तज्ज्ञ कोविड योद्धा म्हणून सहभागी आहेत.च्गेला एक आठवडा हे आयुर्वेद तज्ज्ञ स्वत: डॉनिंग आणि डॉफिंग करून प्रत्यक्षात रुग्ण तपासणी करीत आहेत व त्यांना १० दिवसांची आयुर्वेदिक औषधे देऊन त्याचा रोज फॉलोअप व नोंद ठेवत आहेत.च् एका आठवड्यातच अल्प लक्षणे असणाºया रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ वैद्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस