शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आगरी-कोळी भवन समस्यांच्या विळख्यात; सिडकोचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:23 IST

प्रशस्त मजला वापराविना धूळखात; स्वच्छतेचा अभाव

- अनंत पाटीलनवी मुंबई : शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी बांधवाच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून पामबीच मार्गावर नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात आले आहे; परंतु नियमित देखभालीअभावी या भवनची दुरवस्था झाली आहे. समस्यांचा विळखा पडला आहे. या वस्तूचा एक प्रशस्त मजला वापराविना धूळखात पडला आहे. या परिस्थितीकडे सिडकोच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने स्थानिक आगरी-कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई आणि पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापूर आणि खारघर ते पनवेल परिसरात आगरी-कोळी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. नवी मुंबईचे स्थानिक रहिवासी असलेल्या या भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे. शहरीकरणामुळे येथील मूळ संस्कृती लोप पावली आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने नऊ वर्षांपूर्वी नेरुळ येथे आगरी-कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या भवनचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

या भवनमुळे आगरी-कोळी समाजाची मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहील, हा यामागचा उद्दात हेतू होता. भवनची वास्तू सुबक व आकर्षक असली तरी तिच्या नियमित देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रशस्त वास्तूमध्ये तळमजल्यावर वाहनतळ तसेच लग्नसमारंभासाठी जेवणाची व्यवस्था व कार्यालय आहे. मात्र, येथील स्वच्छतागृह आणि सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे.

बेसीनमधील नळाला पाणीच नाही, शौचालयातील नळ गायब आहेत. तर भिंतीच्या लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयाची भांडी फुटलेली आहेत. दरवाजाची कडीकोयंडा तुटल्यामुळे अक्षरश: दरवाजा दोरीने बांधण्याची वेळ येथील व्यवस्थापनावर आलेली आहे.आगरी-कोळी भवनमध्ये लग्नसोहळ्यासह विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी या ठिकाणी एक लग्नसोहळा होता. येथील गैरसोयींचा वाईट अनुभव आला. त्यानुसार वधूवरांच्या वºहाडी मंडळीने सदर बाब तेथील कार्यालयीन सहायक आर. पी. तवले यांच्या निदर्शनास आणून दिली असता यासंदर्भात सिडकोच्या संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ५०० आसन क्षमता असलेले सभागृह तर दुसºया मजल्यावर लग्न कार्यालय आहे. या इमारतीचा पहिला मजला हा खास आगरी-कोळी संस्कृती जपण्यासाठी ठेवण्यात आला. येथे या समाजाची वापरात आलेली हत्यारे, शेतीसाठीची अवजारे, मासेमारीसाठी लागणारी जाळी, शेती व वापराच्या विविध वस्तू यांचे संग्रहालय तसेच आगरी-कोळी साहित्यासाठी ग्रंथालय नियोजित करण्यात आले होते; परंतु नऊ वर्षे उलटली तरी यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता झाली नसल्याचे दिसून आले आहे.

आगरी कोळी भवनच्या तळमजल्यावरील दुरुस्ती विषयी त्वरित पाहणी करून तसा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात येईल. तसेच भवनमध्ये आगरी-कोळी समाजाची रूढी-परंपरा सास्कृतिक ओळख असलेली अवजारे आणि विविध वस्तू संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.- मंगलसिंग महाले, कार्यकारी अभियंता,सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र