शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा, अर्थसंकल्पातून अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 00:19 IST

Nerul-Uran railway News : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता.

- वैभव गायकरपनवेल : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता. रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.सिडकोच्या वतीने १९९७ साली नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. २०१२मध्ये या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. २७ कि.मी. लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पाचा ६७ टक्के खर्च सिडको आणि ३३ टक्के खर्च रेल्वे करणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ५०० कोटी अपेक्षित होतो. आता मात्र हा खर्च दोन हजार कोटींवर गेला आहे. गेल्या वर्षी ४ नोहेंबरला नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर खारकोपरपर्यंत पहिल्या टप्प्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र वर्ष उलटून गेले तरी उर्वरित खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. कधी वनविभागाच्या जमिनीचे भूसंपादन, कधी खारफुटी आणि खासगी जमिनीच्या संपादनामुळे हे काम रखडले होते. आता या अडथळ्यांपैकी खासगी जमीन संपादनाचा अडथळा दूर झाला असला तरी निधीअभावी हा प्रकल्प रखडला असल्याचे बोलले जात आहे. खारकोपर रेल्वेस्थानकामुळे उलवे नोड नवी मुंबईला जोडला गेला आहे. दुसरा टप्पा पूर्णत्वाला आल्यास नवी मुंबई उरण प्रवास सुखकर होणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात हा रखडलेला टप्पा मार्गी लावण्याबाबत अपेक्षा आहे.जमिनीचे निवाडे अंतिम टप्प्यातखारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खासगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे ६७ गुंठे खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे. या ६७ गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम टप्प्यात आले असून प्रारूप मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविण्यात आले असल्याचे बोलण्यात आले असले तरी हा दुसरा टप्पा कधी मार्गी लागणार याबाबत येथील रहिवाशांना प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई