शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; पनवेलमध्ये नवीन इमारतीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:40 IST

मनुष्यबळाच्या भरती प्रक्रिया बाकी

वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. मनुष्यबळाच्या भरतीनंतर हे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यावर पनवेलकरांना दिलासा मिळेल. सध्याच्या घडीला सुरू असलेले ग्रामीण रुग्णालय पनवेल शहराच्या टोकाला आहे. त्या ठिकाणचे मनुष्यबळ, खाटांची संख्या, सुविधा अपुऱ्या असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

१२० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदन गृहाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये शव ठेवण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. विशेष म्हणजे, पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाजवळील शवविच्छेदनगृह अपुºया जागेत, दुरवस्था झालेल्या खोलीत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शवविच्छेदनगृह असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसतो. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभागाचा यात समावेश आहे.

शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभाग सुरू होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी जाणार असला तरी उर्वरित सर्व काम पूर्ण झाल्याने लवकरात लवकर हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेलकरांकडून होत आहे.सध्याच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी व अधिकाºयांची संख्या १४ आहे. मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. लवकरात लवकर उर्वरित कामे पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. आरोग्यमंत्र्यांच्या दालनात आमदार प्रशांत ठाकूर, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, सहआयुक्त डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. गौरी राठोड आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ५४ कायमस्वरूपी पदे तर ९७ तात्पुरत्या स्वरूपातील पदे भरली जाणार आहेत. तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांच्या मार्फ त देण्यात आले आहेत.

गैरसोय दूर होणारमुंबई-गोवा जुना महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा या महामार्गावर सतत वर्दळ असते, त्यामुळे अपघातांची संख्याही मोठी आहे. अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. नवीन उपजिल्हा रुग्णालयामुळे ही गैरसोय दूर होणार असून, रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील.