शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान होम्सच्या नेरेपाडा, विहिघर येथील जमिनीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:17 IST

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या इमारती बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही

पनवेल : पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या इमारती बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. शेतजमिनीवर घराचे बांधकाम करून महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला जात आहे. तालुक्यात कमी किमतीत घरे मिळवून देतो असे सांगून हजारो नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांनी गंडा घातला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होवूनही या प्रकारात वाढच होताना दिसत आहे. नवीन पनवेल येथील हिंदुस्थान होम्स प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिकाने घर न देता फसवणूक केल्याप्रकरणी १५ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंच अलिबाग येथे तक्र ार केली होती. त्यानुसार हिंदुस्थान होम्स प्रा.लि. यांच्या मालकीची व ताब्यात असलेली नेरे व विहिघरची ६२ गुंठे जमीन थकबाकीपोटी जप्त करून तिचा लिलाव करण्यात आला.पनवेल तालुक्यात स्वत:ला बांधकाम व्यावसायिक म्हणवून घेणाºयांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नवीन पनवेल येथे बांधकाम व्यावसायिकाचे दुकान मांडून बसलेले विजय गुप्ता यांनी विहिघर व नेरेपाडा येथे इमारत बांधून देतो असे सांगून पैसे घेतले, मात्र रूम न दिल्याच्या कारणावरून अस्मिता खांबे, अच्छेलाल यादव, नवनाथ भालेराव, विजय पवार, दत्तात्रेय कांबळे, तब्बसुम कुरेशी, ललित नाखरेकर, लता पाटील, शरद गांगुर्डे, गणेश खानविलकर, परशुराम कदम, कृष्णा वाठारकर, नंदिनी सावंत, बाळकृष्ण देवरे, नम्रता गिजे या पंधरा ग्राहकांची १ कोटी २७ लाख ३९ हजार ४०३ रु पयांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी रायगड जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंच, अलिबाग येथे तक्र ार केली. त्यानुसार ग्राहक तक्र ार निवारण मंचाने १ कोटी २७ लाख ३९ हजार ४०३ रु पयांची रक्कम वसूल करण्यासाठी आदेश दिला होता. त्यानुसार पनवेल तहसील विभागातर्फे१७ जानेवारी रोजी हिंदुस्थान होम्सच्या नावे असलेली नेरेपाडा व विहिघर येथील ६२ गुंठे जागेचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रि येत ६ नागरिकांनी सहभाग घेतला होता. ४३ लाख २९ हजार ५३५ रु पयांपासून जमिनीची बोली करण्यात आली व शेवटी १ कोटी ६८ लाख रु पयापर्यंत येऊन थांबली. पनवेल तालुक्यात पहिल्यांदाच असा लिलाव झाला असल्याची माहिती नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली. नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या भूलथापांना फसू नये, तसेच घर घेताना कागदपत्रे तपासून घ्यावीत, असे आवाहन नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी केले आहे.