मुंबई : जगविख्यात चित्रकार एफ एन सुजा यांच्या २०० चित्रांचा लिलाव आज (गुरूवारी) प्रभादेवी येथील मनोर इंडस्ट्रीच्या तळमजल्याला पार पडणार आहे. या लिलावाकडे जगभरातील कला क्षेत्राचे लक्ष लागले असून सुजा यांच्या एका चित्राची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.१९४० ते ९० या काळात सुजा यांनी ही ऐतिहासिक जगविख्यात चित्रे रेखाटली आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या प्रोगेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपच्या नावे सर्वाधिक महागडे भारतीय चित्र विकण्याचा विक्रम आहे. या लिलावात सुजा यांनी रेखाटलेल्या चित्रांसोबतच काही फोटो आणि त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून लिलावात गर्दी होण्याची शक्यता आहे. सुजा यांनी लँडस्केप, न्यूड, स्टील लाईफ्स अशा अनेक प्रकारांत चित्रे रेखाटलेली आहेत. १९४७ साली त्यांनी रेखाटलेल्या ‘पिझन्ट्स इन गोवा’ या चित्रासाठी १८ ते २२ लाखांची बोली लागली होती. त्यामुळे त्यांच्या उरलेल्या चित्रांसाठी कितीची बोली लागणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
एफ एन सुजा यांच्या २०० चित्रांचा लिलाव
By admin | Updated: December 10, 2015 02:41 IST