शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चळवळ संपवण्याचा होतोय प्रयत्न, आंबेडकरी संघटनांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:05 IST

आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला.

नवी मुंबई : आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याकरिता आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकरी विचारांच्या घटकपक्षांनी वाशीत केला. महाराष्टÑ बंदच्या दरम्यान आंदोलनात सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण हे त्रयस्थ व्यक्तींनी केलेले सूडबुद्धीचे राजकारण असल्याचाही त्यांचा आरोप आहे.भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह नवी मुंबईतही ठिकठिकाणी भीमसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या दरम्यान, एपीएमसीमधील दोन गटांतील वाद व रबाळेतील हाणामारी वगळता इतर कुठे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही; परंतु आंदोलनाच्या दुसºया दिवसापासून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनात सहभागी नसलेल्यांनाही अटक केली जात असल्याचा आरोप जिल्हाअध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या वतीने वाशी येथे ही परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारिपचे अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामिया पटेल, संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत, विजय कांबळे, यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी अद्यापपर्यंत १२५ जणांना अटक केली असून, त्यापैकी ७५ जणांना न्यायालयातून, तर २० जणांना टेबल जामीन मिळालेला आहे; परंतु जे आंदोलनात सहभागी नव्हते, अशांनाही अटक करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा सरकारचा घाट असल्याचाही आरोप ओहोळ यांनी केला. यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात असल्याची चिंता भारिपचे अरुण गायकवाड यांनी व्याक्त केली. तर महाराष्टÑ बंदच्या दरम्यान शांततेत आंदोलने होत असताना, त्रयस्थ संघटनांनी दंगे घडवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे सचिन सावंत यांनी केला.