शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ९ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; मुले पळविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 21:45 IST

या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला.मात्र तोपर्यंत अज्ञात अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

मधुकर ठाकूर 

उरण : वाटसरुने दाखवलेली सतर्कता आणि ९ वर्षाच्या मुलीच्या प्रसंगावधान व धाडसामुळे अज्ञात अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका करून घेतल्याची घटना मंगळवारी (११) संध्याकाळी चिरनेर परिसरात घडली आहे.  चिरनेर गावातील रहिवासी महादेव डोईफोडे हे मंगळवारी सायंकाळी ७-३० वाजताच्या सुमारास आपल्या दोन मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते.फेरफटका मारल्यानंतर मोठा मुलगा घरी परतला होता. तर वडिलांच्या मागून त्यांची ९ महिन्याची मुलगी देवश्री ही एकटीच चालत येत होती.मात्र महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असताना देवश्री मागून येताना दिसली नाही. त्यामुळे  त्यांनी माघारी फिरुन देवश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले दिसले.

दरम्यान, त्याच रस्त्यावरुन येणाऱ्या भरत जाधव यांना एक अज्ञात इसम देवश्रीला उचलून तीचे तोंड दाबून घेऊन जाताना दिसला. तो त्या मूलीचा बाप असा असा समज झाल्याने त्यांनी त्याकडे क्षणभर  दुर्लक्ष केले.मात्र देवश्रीने " काका मला वाचवा " अशी हाक दिल्यानंतर क्षणातच काही तरी काळेबेरं असल्याची जाणीव जाधवांना झाली.देवश्रीच्या हाकेला प्रतिसाद देत जाधव यांनीही अज्ञात अपहरणकर्त्यांला मुलीला सोडण्यासाठी आवाज दिला.त्याच दरम्यान प्रसंगावधान राखून ९ वर्षीय देवश्रीने अपहरणकर्त्यां इसमाच्या हातावर जोरदार चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढला.देवश्रीच्या धाडसामूळे व भरत जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांचा देवश्रीला पळविण्याचा प्रयत्न फसला आणि मुलगी सुखरूप आई वडिलांच्या कुशीत विसावली.

या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला.मात्र तोपर्यंत अज्ञात अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . तक्रारीनंतर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली  तातडीने तपासाला सुरूवात केली आहे. तसेच अज्ञात अपहरणकर्ता इसम हा आपल्या चारचाकी वाहनासह सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकारानंतर पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.