शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

४ बांग्लादेशीविरोधात एटीएसची कारवाई, खारघरच्या बेलपाडामध्ये होते वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:21 IST

हा वर्षांपूर्वी मोहम्मद हा पहिल्यांदा घुसखोरी करून भारतात आल्यानंतर अनेक दिवस पनवेलमध्ये राहायला होता.

नवी मुंबई : ट्युरिस्ट व मेडिकल व्हिजावर भारतात आल्यानंतर परत न जाता ओळख लपवून राहणाऱ्या दोन दांपत्यांना बांग्लादेशींना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले आहे. मागील दहा वर्षात अनेकदा घुसखोरी मार्गाने भारतात ये जा केल्यानंतर त्याने पनवेलमध्ये स्वतःचे आधारकार्ड देखील बनवून घेतले आहे. 

खारघरच्या बेलपाडा परिसरात घुसखोर बांग्लादेशी राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बेलपाडा परिसरात शोधमोहीम राबवली. त्यामध्ये एका ठिकाणावरून मोहम्मद जिनत शेख व सुमोन सलीम या दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघेही बांग्लादेशी असून त्यांच्या पत्नी देखील बांग्लादेशी असून सर्वजण घुसखोरी करून भारतात आल्याची कबुली दिली. त्यापैकी मोहम्मद याचा सहा वर्षाचा मुलगा देखील त्यांच्यासोबत राहत आहे.

दहा वर्षांपूर्वी मोहम्मद हा पहिल्यांदा घुसखोरी करून भारतात आल्यानंतर अनेक दिवस पनवेलमध्ये राहायला होता. त्याठिकाणी त्याने स्वतःचे आधार कार्ड देखील बनवून घेतले आहे. यानंतर तो अनेकदा घुसखोरी मार्गाने बांग्लादेशला ये जा करायचा. त्याठिकाणी त्याने स्वतःचे पासपोर्ट देखील बनवून घेतले होते. त्याद्वारे देखील तो अधून मधून भारतात ट्युरिस्ट तसेच मेडिकल व्हिजावर भारतात यायचा. वर्षभरापूर्वी तो मेडिकल व्हिजावर आला असता पुन्हा परत गेला नसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध घेतला असता दुसरे दाम्पत्य देखील त्याच्यासह आढळून आले. या सर्वांवर खारघर पोलिस ठाण्यात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना पनवेल व बेलपाडा परिसरात भाड्याने आश्रय देणाऱ्या घर मालकांवर देखील कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई