शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 00:11 IST

Navi Mumbai : मागील दोन महिन्यांपासून राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागले आहे. मात्र, अद्यापही क्रीडा क्षेत्राविषयी राज्य सरकारने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या, तसेच खासगी क्रीडा अकॅडमी बंदच आहेत.

-  सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. मागील नऊ महिन्यांपासून त्यांचे प्रत्यक्ष मैदानी सराव बंद आहेत. परिणामी, आगामी काळात स्पर्धा झाल्यास त्यांना छाप उमटवणे अवघड होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागले आहे. मात्र, अद्यापही क्रीडा क्षेत्राविषयी राज्य सरकारने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या, तसेच खासगी क्रीडा अकॅडमी बंदच आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील खेळाडूंसह राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा सराव पूर्णपणे बंद आहे. पावसाळ्याचा कालावधी हा खेळाडूंच्या सरावाचा कालावधी असतो, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. मात्र, कोरोना व लॉकडाऊन यामुळे खेळाडूंचा सरावाचा कालावधी घरातच गेला आहे.नवी मुंबईत अधिकाधिक खेळाडू घडविण्यावर पालिकेचा जोर आहे. त्याकरिता पालिकेचेही क्रीडा प्रशिक्षण केंद्र असून, तेही सध्या बंद आहे. शहरात सध्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तराचे पाचशेहून अधिक खेळाडू घडत आहेत. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, तायक्वांडो, जलतरण यासह अनेक स्पर्धांमध्ये ते ठसा उमटवत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. मात्र, कोरोनाने या खेळाडूंचे वर्ष गिळल्याने चालू वयोगटातील स्पर्धेतल्या संधी गमवाव्या लागणार आहेत.त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे खेळाडूंचा मैदानी सराव पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, आगामी काळात स्पर्धेत उतरण्यापूर्वी त्यांना अधिक सरावाची गरज भासणार आहे. त्यामध्ये त्यांच्या अनेक सुवर्णसंधी हातून निसटण्याची शक्यता आहे.- श्रीनिवास गुप्ता, ॲथलेन्टिक प्रशिक्षक

देशात, तसेच देशाबाहेर जलतरण स्पर्धा सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्याप तरणतलाव खुले नसल्याने सराव थांबला आहे. याचा परिणाम खेळाडूंवर, तसेच राज्याच्या दर्जावर होणार आहे.- ज्योत्स्ना पानसरे, आंतराष्ट्रीय जलतरणपटू 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई