शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

घरांच्या सोडतीसाठी सिडकोकडून ‘तारीख पे तारीख’; अर्जदारांत संभ्रम; तळोजा, द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ सदनिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 06:28 IST

गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे.

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३३२२ घरांची योजना जाहीर केली होती. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी नियोजित केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ती  पुढे ढकलण्यात आली.  कोणतेही अधिकृत प्रसिद्धीपत्रक न काढता थेट संकेतस्थळावर याबाबतची सूचना दिली आहे. यातही सोडतीच्या दोन तारखा बदलल्याने अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यांपैकी ३३२२ घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १६ एप्रिल रोजी संपली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १९ एप्रिलला संगणकीय सोडत काढणे अपेक्षित होते. मात्र,  लोकसभा निवडणुकीच्या  आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलली. विशेष म्हणजे याबाबत सिडकोने  कोणतेही अधिकृत वृत्त जारी केले नाही. त्याऐवजी ८ मे रोजी संगणकीय सोडत काढली जाईल, अशी माहिती संकेतस्थळावर दिली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपते, मग मध्येच ८ जूनचा मुहूर्त कसा काढला, असा सवाल अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे. अर्जदारांत निर्माण झालेला संभ्रम लक्षात घेऊन घरांच्या संगणकीय सोडतीसाठी ८ मेऐवजी ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला आहे. सोडतीसाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून सुरू असलेल्या तारखेच्या घोळामुळे अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उपलब्ध घरांचा तपशील

 विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ३३२२ घरांपैकी  द्रोणागिरी नोडमध्ये ६१, तर तळोजामध्ये २५१, अशा एकूणच ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत.

 द्रोणागिरीतील ३७४ व तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नानंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या ३०१० सदनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे.

टॅग्स :cidcoसिडको