शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना लुटणाऱ्यांना केले अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

या प्रकरणात अटक करण्यात आलेला सूरज पाटील हा खारघर सेक्टर-१३ मध्ये, तर त्याचा सहकारी सचिन पवार हा खालापूर येथे राहाण्यास आहे.

पनवेल : दिवसा रिक्षा चालवून रात्रीच्या सुमारास संधी साधून प्रवाशांच्या अंगावरील दागिने लुटणाºया दोघा रिक्षाचालकांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. सूरज सुधाकर पाटील (२४) आणि सचिन राजू पवार (२३) अशी या दोघा लुटारूंची नावे असून, त्यांनी लुटलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा एक लाख ४६ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेला सूरज पाटील हा खारघर सेक्टर-१३ मध्ये, तर त्याचा सहकारी सचिन पवार हा खालापूर येथे राहाण्यास आहे. हे दोघेही खारघरमध्ये रिक्षा चालवायचे, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी संधी साधून प्रवाशांच्या अंगावरील दागिने लुटायचे. अशाच प्रकारे या दोघांनी खारघर सेक्टर-११मध्ये राहाणाºया श्रेयस पवार (२८) या तरु णासोबत भाड्याच्या कारणावरून वाद घालून त्याच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ५० हजार रु पये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले होते.या प्रकरणी खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार खिलारे, बाबाजी थोरात, पोलीस नाईक नेवारे, म्हात्रे, कान्हू, पोलीस शिपाई मिसाळ आदीच्या पथकाने या घटनेतील आरोपी रिक्षाचालकांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन दोन दिवसांत या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी बालभारती शाळेजवळ तरु णाला लुटल्याची त्या प्रमाणे एका महिलेच्या गळ्यातील दागिने लुटल्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्याचप्रमाणे या दोघांनी लुटलेले ११ ग्रॅम वजनाची व सात ग्रॅम वजनाच्या ३६ हजार रु पये किमतीच्या दोन अर्धवट तुटलेल्या सोन्याच्या चेन तसेच दागिने लुटण्यासाठी दोघा लुटारूंनी वापरलेली रिक्षा, असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील सूरज पाटील याच्यावर बलात्कार, चोरी व मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा