शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये अडकणारे पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:47 IST

एटीएम मशीनमध्ये ग्राहकांचे अडकलेले पैसे चोरणा-या एकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : एटीएम मशीनमध्ये ग्राहकांचे अडकलेले पैसे चोरणा-या एकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. तो अ‍ॅक्सिस बँकेने एटीएम देखभालीसाठी नेमलेल्या कंपनीचा कर्मचारी आहे. ग्राहकांचे मशीनमध्ये पैसे अडकल्याचे समजताच तो बनावट चावीने मशीन उघडून पैशांची चोरी करायचा.सुयोग धिवार व जॉन्सन शेट्टी अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सुयोग हा हिटाची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीचा मॅनेजर असून ही कंपनी अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीम मशीनची देखभाल दुरुस्ती बघते. त्यामुळे मशीनमधील बिघाडामुळे एखाद्या ग्राहकाचे पैसे मशीनमध्येच अर्धवट अडकल्यास त्याची माहिती सुयोग याला मोबाइलवर मिळायची. हे पैसे चोरण्यासाठी त्याने एटीएम मशीनच्या बनावट चावी बनवून ठेवल्या होत्या. त्याद्वारे साथीदार जॉन्सन शेट्टी याच्या मदतीने तो एटीएम मशीनमधील पैशांची चोरी करायचा. अशा प्रकारे त्याने ७० हजार रुपयांहून अधिक रकमेची चोरी केल्याचे समोर आले आहे.एटीएममध्ये पैसे अडकल्याची बाब अनेकदा नागरिकांच्या निदर्शनास येत नसे. त्याचा फायदा घेऊन मोबाइलवर संबंधित एटीएममध्ये पैसे अडकल्याचा मॅसेज येताच बनावट चावीने ते मशीन उघडून अडकलेल्या पैशांची चोरी केली जायची. अशाच प्रकारे त्यांनी सानपाडा परिसरातील एका एटीएममधून पैशाची चोरी केली होती. परंतु घाईमध्ये त्यांच्याकडून मशीनचा दरवाजा उघडा राहिला. यासंबंधीची तक्रार सानपाडा पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विकास रामुगडे यांनी पोलीस निरीक्षक देशमुख, सहायक निरीक्षक केशव दिंडे, सहायक उपनिरीक्षक काशिनाथ राऊळ, सुमंत बांगर, गणपत पवार, गुरुनाथ भुंडेरे, श्रीकांत नार्वेकर, अभय काकड यांचे पथक तयार केले होते. त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही व त्याच वेळी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. या वेळी एटीएममधून पैसे काढणारी व्यक्ती पैसे काढल्यानंतर जुईनगर येथील बारमध्ये गेल्याचे दिसून आले.त्यानुसार पोलिसांनी बारमध्ये बिल भरणा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार्डची माहिती तपासली. या वेळी सुयोग धिवार व त्याचा सहकारी जॉन्सन शेट्टी यांची माहिती समोर आली. तसेच हे दोघेही नियमित त्या परिसरात येत असल्याचेही समजताच त्यांना सानपाडा परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी मागील काही दिवसात सुमारे ७० हजार रुपये एटीएममधून चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी ४३ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.>मोबाइलवर संबंधित एटीएममध्ये पैसे अडकल्याचा मॅसेज येताच बनावट चावीने ते मशीन उघडून अडकलेल्या पैशांची चोरी केली जायची. अशाच प्रकारे त्यांनी सानपाडा परिसरातील एटीएममधून पैशाची चोरी केली होती.