शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

उरण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची पाणी बिलापोटी पावणे २७ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 21:03 IST

पाण्याची बिले भरण्यास मात्र ग्रामपंचायतीकडून दिरंगाई केली जात आहे

मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी जानेवारी २०२३ पर्यंत २६ कोटी ७० लाख ५८ हजार ३२२ रुपये इतकी थकबाकी असल्याची माहीती एमआयडीसीचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली. उरण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.

पाण्याची बिले भरण्यास मात्र ग्रामपंचायतीकडून दिरंगाई केली जात आहे.जानेवारी २०२३ अखेरपर्यत १५ ग्रामपंचायतींकडे २६ कोटी ७० लाख ५८ हजार ३२२ रुपये थकबाकी आहे.या बीलामध्ये पाण्याचे बील, वाढीव कोटा आणि डीपीसीचा समावेश आहे.  या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये नवीन शेवा-एक कोटी २१ लाख २८ हजार ८४४, हनुमान कोळीवाडा- ३९ लाख २ हजार ८५९ , करळ-८८ लाख ३३ हजार १८३, धुतुम-एक कोटी २९ लाख ८१ हजार २३६, जसखार-एक कोटी ९५ लाख ०२ हजार ३३४,  फुंडे- ३ कोटी ०७ लाख १९ हजार ०३४, सावरखार-५४ लाख १६ हजार २८६, डोंगरी-६१ लाख १४ हजार ८४४, सोनारी -एक कोटी ५८ लाख ३१ हजार ९८६, नागाव-एक कोटी ४२ लाख ६९ हजार २५७, चाणजे- ८ कोटी ५२ लाख ८८ हजार ०७७,पाणजे-५ लाख ६० हजार ८५७ , चिर्ले- २ कोटी २३ लाख २० हजार २६२, केगाव-२ कोटी ०४ लाख ४३ हजार ४००,  म्हातवली- ८७ लाख ४५ हजार ८६३आदी १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अशा १५ ग्रामपंचायतींकडे २६ कोटी ७० लाख ५८ हजार ३२२ रुपयांची थकबाकी असल्याची माहीती एमआयडीसीचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली.

यापैकी अनेक ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीकोनातुन सधन समजल्या जात आहेत.अशा ग्रामपंचायती नागरिकांकडुन पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसुल करतात.मात्र अशा सधन समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच थकबाकीदार म्हणुन आघाडीवर आहेत.याबाबत नागरिकांमधुन आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले  भरावी तरी कशी अशी विचारणा काही ग्रामपंचायतींकडुन केली जात आहे.मात्र ठरवुन दिलेल्या कोट्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा केला जात आहे.थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना नोटीसाही पाठवण्यात येतात.मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यावधीच्या थकबाकीमुळे मात्र पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत असल्याचेही  एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण