शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना निवाऱ्याची व्यवस्था; पोलीस आयुक्तालयामार्फत सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:09 IST

पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली याठिकाणी होत आहे. राज्यभरातील उमेदवार याठिकाणी पोलीस भरतीसाठी आले असताना या उमेदवारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली नव्हती.

पनवेल : पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली याठिकाणी होत आहे. राज्यभरातील उमेदवार याठिकाणी पोलीस भरतीसाठी आले असताना या उमेदवारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १८ मार्च रोजी बातमी प्रकाशित केल्यानंतर या उमेदवारांची रात्री झोपण्याची व्यवस्था पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या दोन वेळच्या अल्पोपहारासाठी देखील सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.‘लोकमत’ने भावी पोलिसांची धडपड व पोलीस भरतीसंदर्भात उद्भवणाºया विविध अडथळ्यांची माहिती देणारे वृत्त प्रकाशित के ले होते. दिवसभर मैदानी चाचणी प्रक्रि या पार केलेल्या या उमेदवारांना उघड्यावरच रात्र काढावी लागली होती. राज्यभरातील कानाकोपºयातून व दुर्गम भागातील तरु णांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत असताना ‘लोकमत’ने या समस्येवर प्रकाश टाकला असता या तरु णांची रात्री झोपण्याची व्यवस्था मुख्यालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तरुणांच्या दोन वेळच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी खारघर वेल्फेअर असोसिएशन ही संस्था पुढे सरसावली आहे. कळंबोली मुख्यालयाजवळ सकाळी या उमेदवारांना रोज खिचडी ही संस्था पुरवीत आहे. सायंकाळी देखील खारघरमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था या संस्थेचे अध्यक्ष मनोज शारबिंद्रे हे स्वखर्चाने करीत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १७५पदांसाठी ही भरती प्रक्रि या सुरू आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ही भरती सुरू असल्याने खारघर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज शारबिंद्रे यांनी पनवेल महानगर पालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना खारघर, कळंबोली परिसरात तात्पुरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत शारबिंद्रे यांनी व्यक्त केली. पोलीस भरतीची ही प्रक्रि या १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस