शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कळंबोली स्टील मार्केटच्या हस्तांतरणाचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:42 IST

पायाभूत सुविधांचा बोजवरा; सिडको, बाजार समितीकडून टोलवा-टोलवी

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील मार्केटच्या हस्तांतरणाबाबत वाद सुरू झाला आहे. बाजार समितीकडे आवारवर्ग केल्याचा दावा सिडकोने केला आहे. मात्र, या संदर्भातील प्रक्रिया अद्यापि पूर्ण झाली नसल्याचे बाजार समितीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हस्तांतरणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या या घोळाचा फटका मार्केटमधील पायाभूत सुविधांना बसला आहे.कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर स्टील मार्केट उभारण्यात आले. १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले आहेत. सिडकोने १९८० मध्ये हे भूखंड लीज करारावर व्यापाऱ्यांना दिले आहेत. भूखंड देऊन सिडकोने आपली जबाबदारी झटकली आहे. कारण या मार्केटमध्ये पायाभूत सुविधांचा वानवा आहे.बाजारात आवारातील मुख्य रस्त्यांची देखभाल, दिवाबत्ती दुरुस्ती व देखभाल, रस्त्यालगत वृक्षारोपण करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. अंतर्गत कच्चे रस्ते, सर्व्हिस रोड, नाले, गटारे, सुरक्षा व्यवस्था, वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन आदीची जबाबदारी बाजार समितीने पार पाडणे गरजेचे आहे. मात्र, दोन्ही प्रशासनाकडून आपापल्या जबाबदारीला बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, सिडको आणि बाजार समिती प्रशासन या संदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे.स्टील मार्केटच्या विकास आराखड्यात लहान शौचालये-१२, विद्युत केंद्र-१५, सुरक्षा मनोरे-१०, पोलीस चौक्या-०२, वाहन थांबे-१६, पेट्रोल पंप-०१, वजन काटे-०६, एमटीएनएल केंद्र-०२, बगिचे-४१, व्यापारी संघटनांच्या सहकारी संस्थेसाठी भूखंड-०३ आदीचे नियोजन करण्यात आले होते; परंतु यापैकी किती सुविधांची पूर्तता करण्यात आली, हा संशोधनाचा विषय बनला आहे.स्टील मार्केटमधील रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. त्यांनी अंतर्गत रस्ते करून देणे क्र मप्राप्त होते. मात्र, प्राधिकरणाने जबाबदारी घेतली नाही. मार्केट परिसर आम्ही हस्तांतरित करून घेतलेला नाही.- विकास रसाळ,मुख्य कार्यकारी अधिकारी,स्टील मार्केट कमिटीस्टील मार्के ट बाजार समितीकडे हस्तांतरित झाले आहे, त्यानुसार करारनामाही झाला आहे. त्यावर संबंधितांच्या सह्याही आहेत, त्यामुळे अंतर्गत रस्ते, पथदिव्यांसह इतर पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे.- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता,सिडको, कळंबोली नोड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई