शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:42 IST

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.३ चे अं.भु.क्र.१२७ अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, या कामाच्या सकारात्मक भिन्नता व नकारात्मक भिन्नता व अतिरिक्त बाबला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली.

पनेवल : पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची  सभा शुक्रवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शाळा क्रमांक ३ चे नव्याने बांधकाम,जम्बो कोविड केअर सेंटरला वाहनांचा पुरवठा करण्यासह पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविणे  अतिरिक्त बाबींच्या खर्चास मंजुरी आली.पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.३ चे अं.भु.क्र.१२७ अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, या कामाच्या सकारात्मक भिन्नता व नकारात्मक भिन्नता व अतिरिक्त बाबला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकरिता कोविड-१९ कामी महापालिकेचे मंजूर ठेकेदार जे. के. टुरिस्ट ॲण्ड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत वाहने भाडेतत्त्वावर घेणेकामी करण्यात आलेला खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषय स्थगित करण्यात आला. अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागासाठी अनधिकृत बांधकामे,अतिक्रमणे, धोकादायक बांधकामे निष्कासित करण्याच्या कामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री व वाहने पुरविण्याकरिता जाहीर ई निविदेच्या माध्यमातून फेर ऑनलाईन ई निविदेस मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या मुदतपूर्ती झालेल्या मुदत ठेवींची नव्याने राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. पनवेल मनपा हद्दीतील शौचालयांची साफसफाई करण्याबाबतच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.सन २०२१-२०२२ व सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता व सन २०२३-२०२४  च्या निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधीकरिता पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी, उद्यान  सार्व. बागेत व महापालिका सूचित करेल त्या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबिन ), आसनव्यवस्था कामी बाकडे, उद्यानातील खेळणी व उद्यानात व्यायामाचे साहित्य इ. चा पुरवठा करुन बसविणे करिता निविदा पत्रकात नमूद केलेले साहित्य पुरविणे कामी  प्राप्त निविदा धारकांच्या दरास विषयास मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :panvelपनवेल