शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराला विरोध डावलून मंजुरी; ७७,१९६ कोटी रुपयांचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:37 IST

जागतिक स्तरावरील एक मोठे आणि जेएनपीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराच्या कामाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.

मधुकर ठाकूर -उरण : मच्छीमारांचा तीव्र विरोध डावलून सुमारे ७७,१९६ कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या बंदराची वर्षाकाठी सव्वादोन कोटी कंटेनर हाताळणीची क्षमता असणार आहे. दरम्यान, जेएनपीएने २०२० पासून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात केली आहे.जागतिक स्तरावरील एक मोठे आणि जेएनपीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराच्या कामाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. वर्षाकाठी दाेन कोटी ३० लाख कंटेनर क्षमतेचे वाढवण मेगा पोर्ट उभारण्याच्या कामाला आता चालना मिळणार आहे.हे मेगा पोर्ट दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या विकासकामांसाठी जेएनपीए ४४ हजार कोटी खर्च करणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ३३ हजार कोटी रुपये प्रायव्हेट सेक्टरमधून खर्च केला जाणार आहे. या कामामध्ये बंदराकडे जाणारे स्वतंत्र रस्ते तयार करणे, ब्रेकवॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, भूसंपादन, रेल्वे मार्गाची निर्मिती करणे, वीजपुरवठा व्यवस्था, बंधाऱ्यांची निर्मिती, पाणीपुरवठा, कार्गो बर्थ उभारणी आदी कामांचा समावेश आहे.मच्छीमारांचा कडवा विरोध, सीआरझेड, केंद्रीय मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि पर्यावरण विभागाकडून विविध मंजुरी मिळविण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे मागील चार वर्षांपासून त्याचे काम जवळपास रखडले होते. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने (DTEPA) परवानगी दिली आहे. या परवानगीच्या आधारावर आता केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे विविध प्रकारच्या आवश्यक परवानगीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे जेएनपीएकडून सांगितले जात आहे. 

डहाणू तालुक्यात वाढवण बंदराची स्थापना आणि विकास करण्यास विविध अटी आणि  शर्तींच्या अधीन राहून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. ७७,१९६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या व गुंतवणुकीसह उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बंदरातून प्रतिवर्षी सुमारे ३०० मिलियन टन कंटेनर मालाची वाहतूक होईल. हे जगातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार आहे.- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीए

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई