शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ, सिडकोकडे केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:44 IST

खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत.

कळंबोली : खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पाला रहिवासी, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सिडकोने परस्पर गृहप्रकल्पाचा निर्णय घेतल्याने याबाबत माहिती मागितली असता, सिडकोकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी सांगितले.खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक ११ हा सिडकोच्या शहर नियोजनानुसार बस टर्मिनल्ससाठी राखीव होता. मात्र, या ठिकाणी बस टर्मिनल्स तयार करण्यात आले नाही. आता पंतप्रधान आवास योजनेसाठी सिडकोने खाली बस टर्मिनल्स व वरती घर बांधण्याचे नियोजन केले आहे.काही दिवसांपूर्वी सिडकोने मोठी मोहीम राबवून भूखंडावरील मच्छीमार्केट, इतर दुकाने हटवली. आता भूखंडाला चहुबाजूंनी पत्रे लावून ठेकेदाराने जागा काबीज केली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात खंड पडल्याने वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने नाराजी व्यक्त झाली.बसटर्मिनल आणि टॉवर उभारण्यात येणार असल्याने विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनानुसार बांधकाम केले नाही तर सर्वसामान्य नागरिकांवर सिडकोकडून कारवाई करण्यात येते. त्यांना सीसी आणि ओसी दिली जात नव्हती. मग शहर नियोजनानुसार या ठिकाणी बस टर्मिनल्स असताना वरती घरे कशी काय बांधली जात आहेत, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी उपस्थित केला आहे.खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंडावर होणारा प्रकल्प, आरक्षण या विषयी माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी, सिडकोच्या नियोजन विभागाकडे माहिती मागितली आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०१९ रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्याप सिडकोकडून माहिती देण्यात आलेली नाही. अखेर त्यांनी ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळत नसल्याने पुन्हा अपील केले आहे.>गृहप्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनखांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. नागरी हक्क समितीबरोबर शिवसेनेने हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रे काढून वाट मोकळी करून दिली होती. बुधवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कामोठे येथील रहिवाशांच्या भावना कळवल्या. याबाबत ते काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे ध्यान लागून राहिले आहे.